ABOUT THE SPEAKER
Richard Dawkins - Evolutionary biologist
Oxford professor Richard Dawkins has helped steer evolutionary science into the 21st century, and his concept of the "meme" contextualized the spread of ideas in the information age. In recent years, his devastating critique of religion has made him a leading figure in the New Atheism.

Why you should listen

As an evolutionary biologist, Richard Dawkins has broadened our understanding of the genetic origin of our species; as a popular author, he has helped lay readers understand complex scientific concepts. He's best-known for the ideas laid out in his landmark book The Selfish Gene and fleshed out in The Extended Phenotype: the rather radical notion that Darwinian selection happens not at the level of the individual, but at the level of our DNA. The implication: We evolved for only one purpose — to serve our genes.

Of perhaps equal importance is Dawkins' concept of the meme, which he defines as a self-replicating unit of culture -- an idea, a chain letter, a catchy tune, an urban legend -- which is passed person-to-person, its longevity based on its ability to lodge in the brain and inspire transmission to others. Introduced in The Selfish Gene in 1976, the concept of memes has itself proven highly contagious, inspiring countless accounts and explanations of idea propagation in the information age.

In recent years, Dawkins has become outspoken in his atheism, coining the word "bright" (as an alternate to atheist), and encouraging fellow non-believers to stand up and be identified. His controversial, confrontational 2002 TED talk was a seminal moment for the New Atheism, as was the publication of his 2006 book, The God Delusion, a bestselling critique of religion that championed atheism and promoted scientific principles over creationism and intelligent design.

More profile about the speaker
Richard Dawkins | Speaker | TED.com
TEDGlobal 2005

Richard Dawkins: Why the universe seems so strange

रिचर्ड डॉकिन्स सांगतायत आपल्या "विचित्र" विश्वाबद्दल

Filmed:
4,013,427 views

विश्वातल्या प्रक्रिया कळून घ्यायला मानवी नजर कशी तोकडी पडू शकते हे दाखवत जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स "अतर्क्य गोष्टींचा विचार" करायला सुचवतात.
- Evolutionary biologist
Oxford professor Richard Dawkins has helped steer evolutionary science into the 21st century, and his concept of the "meme" contextualized the spread of ideas in the information age. In recent years, his devastating critique of religion has made him a leading figure in the New Atheism. Full bio

Double-click the English transcript below to play the video.

00:25
My title: "Queerer than we can suppose: The strangeness of science."
0
0
6000
माझ्या भाषणाचं शीर्षक आहे: "आपल्याला वाटू शकते त्याहूनही विचित्र : विज्ञानाची नवलाई"
00:31
"Queerer than we can suppose" comes from J.B.S. Haldane,
1
6000
3000
"आपल्याला वाटू शकते त्याहूनही विचित्र" हे शब्द आहेत प्रख्यात जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस्‌. हॉल्डेन यांचे.
00:34
the famous biologist, who said, "Now, my own suspicion is
2
9000
3000
हॉल्डेन म्हणाले होते, "आता मला स्वतःला अशी शंका येतेय की
00:38
that the universe is not only queerer than we suppose,
3
13000
4000
हे विश्व केवळ आपल्याला वाटतं त्याहून विचित्र नसून
00:42
but queerer than we can suppose.
4
17000
2000
आपल्याला वाटू शकतं त्याहूनही जास्त विचित्र आहे.
00:44
I suspect that there are more things in heaven and earth
5
19000
3000
माझ्या अदमासानं, अंतराळात आणि पृथ्वीवर इतक्या जास्त गोष्टी अस्तित्वात आहेत
00:47
than are dreamed of, or can be dreamed of, in any philosophy."
6
22000
5000
की त्या कोणत्याही तत्त्वविचारात किंवा मतप्रणालीत कल्पिल्या गेल्या नसतील, किंवा त्यांची कल्पना करणंही शक्य नसेल.
00:53
Richard Feynman compared the accuracy of quantum theories --
7
28000
5000
रिचर्ड फाइनमननी पुंजसिद्धांताच्या (क्वांटम थियरी) प्रयोगांचे निष्कर्ष वर्तवण्याबाबतच्या अचूकपणाची तुलना
00:58
experimental predictions -- to specifying the width of North America
8
33000
5000
उत्तर अमेरिकेची रुंदी एका केसभर अंतराच्या फरकाने
01:03
to within one hair's breadth of accuracy.
9
38000
4000
अचूक सांगता येण्याशी केली होती.
01:07
This means that quantum theory has got to be in some sense true.
10
42000
5000
म्हणजेच पुंजसिद्धांत एका अर्थी ’खरा’ आहे.
01:12
Yet the assumptions that quantum theory needs to make
11
47000
2000
तरीदेखील, अशी प्रयोगांची भाकितं मांडण्यासाठी पुंजसिद्धांतामध्ये जी गृहीतकं वापरावी लागतात
01:14
in order to deliver those predictions are so mysterious
12
49000
3000
ती इतकी गूढ आहेत की एकदा खुद्द फाइनमनवर
01:18
that even Feynman himself was moved to remark,
13
53000
3000
"आपल्याला पुंजसिद्धांत कळला आहे असं तुम्हांला वाटत असेल
01:21
"If you think you understand quantum theory,
14
56000
3000
तर तुम्हांला पुंजसिद्धांत कळलेला नाही"
01:24
you don't understand quantum theory."
15
59000
3000
असं म्हणायची पाळी आली होती.
01:27
It's so queer that physicists resort to one or another
16
62000
5000
हा सिद्धांत इतका विचित्र आहे की वेगवेगळे भौतिकशास्त्रज्ञ
01:32
paradoxical interpretation of it.
17
67000
2000
या सिद्धांतातून निघणाऱ्या वेगवेगळ्या विरोधाभासी अर्थांवर विश्वास ठेवतात.
01:34
David Deutsch, who's talking here, in "The Fabric of Reality,"
18
69000
5000
"खरेपणाचे वस्त्र" या विषयावर इथे बोलणार असलेले डेविड डॉयश यांनी
01:39
embraces the "many worlds" interpretation of quantum theory,
19
74000
6000
पुंजसिद्धांताच्या "बहुवैश्विक" अर्थांतराची बाजू घेतली आहे.
01:45
because the worst that you can say about it is
20
80000
2000
कारण या अर्थांतरात काही वाईट असेल तर ते फार फार तर इतकंच:
01:47
that it's preposterously wasteful.
21
82000
2000
त्यात प्रचंड उधळेपणा आहे!
01:49
It postulates a vast and rapidly growing number of universes
22
84000
4000
या अर्थांतरानुसार भरमसाठ आणि वेगात वाढत राहणाऱ्या संख्येनं अनेक समांतर विश्वं अस्तित्वात आहेत.
01:54
existing in parallel -- mutually undetectable except through
23
89000
4000
पुंजभौतिकी (क्वांटम मेकॅनिक्स) मधल्या प्रयोगांच्या अरुंद भुयारातूनच फक्त एका विश्वाला दुसऱ्या विश्वाचं दर्शन होऊ शकतं;
01:58
the narrow porthole of quantum mechanical experiments.
24
93000
6000
एरवी त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाचा पत्ता लावता येत नाही.
02:04
And that's Richard Feynman.
25
99000
3000
आणि ही रिचर्ड फाइनमनची कल्पना होती.
02:07
The biologist Lewis Wolpert
26
102000
3000
जीवशास्त्रज्ञ लुईस वॉलपर्ट यांच्या मते
02:10
believes that the queerness of modern physics
27
105000
2000
आधुनिक भौतिकशास्त्राचं वैचित्र्य
02:12
is just an extreme example. Science, as opposed to technology,
28
107000
4000
हे एका टोकाचं उदाहरण झालं. विज्ञान (तंत्रज्ञान नव्हे)
02:16
does violence to common sense.
29
111000
3000
माणसाच्या सारासार विचाराला (कॉमन सेन्स) धक्का देतं.
02:19
Every time you drink a glass of water, he points out,
30
114000
3000
वॉलपर्ट आपल्या ध्यानात आणून देतात की जेव्हा आपण एक पेलाभर पाणी पितो,
02:23
the odds are that you will imbibe at least one molecule
31
118000
3000
त्या प्रत्येक वेळी आपल्या शरीरात
02:26
that passed through the bladder of Oliver Cromwell. (Laughter)
32
121000
5000
ऑलिव्हर क्रॉमवेलच्या मूत्राशयातून गेलेला किमान एक तरी पाण्याचा रेणू जात असतो. (हशा)
02:31
It's just elementary probability theory.
33
126000
3000
हा अगदी प्राथमिक स्वरूपाच्या संभाव्यतेच्या सिद्धांतातून (प्रोबॅबिलिटी थियरी) आलेला निष्कर्ष आहे.
02:34
The number of molecules per glassful is hugely greater
34
129000
3000
एका पेल्यातल्या पाण्याच्या रेणूंची संख्या ही जगातल्या
02:38
than the number of glassfuls, or bladdersful, in the world --
35
133000
3000
पाण्याने भरलेल्या पेल्यांच्या किंवा मूत्राशयांच्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त आहे.
02:41
and, of course, there's nothing special about Cromwell
36
136000
3000
आणि अर्थात, ही गोष्ट खास क्रॉमवेल किंवा मूत्राशयांनाच लागू होते असं नाही.
02:44
or bladders. You have just breathed in a nitrogen atom
37
139000
3000
तुम्ही आत्ताच एका उंच सायकॅड झाडाच्या डाव्या बाजूला असलेल्या
02:47
that passed through the right lung of the third iguanodon
38
142000
3000
तिसऱ्या इग्वानॉडॉनच्या (एक डायनॉसॉर) उजव्या फुप्फुसातून गेलेला
02:51
to the left of the tall cycad tree.
39
146000
2000
नायट्रोजनचा अणू तुमच्या श्वासावाटे आत घेतलाय!
02:56
"Queerer than we can suppose."
40
151000
2000
"आपल्याला वाटू शकतं त्याहूनही विचित्र."
03:00
What is it that makes us capable of supposing anything,
41
155000
3000
आपल्यामध्ये ही ’वाटण्याची’, ’गृहीत धरण्याची’ क्षमता आहे ती कशामुळे?
03:03
and does this tell us anything about what we can suppose?
42
158000
3000
आणि त्यातून आपल्याला आपण काय गृहीत धरू शकतो याबद्दल काही माहिती मिळू शकते का?
03:07
Are there things about the universe that will be
43
162000
3000
या जगात अशा काही गोष्टी आहेत का
03:10
forever beyond our grasp, but not beyond the grasp of some
44
165000
4000
ज्या कायमच आपल्या आकलनाच्या पलीकडे राहतील, पण कुठल्यातरी प्रगत बुद्धीच्या जीवांना
03:14
superior intelligence? Are there things about the universe
45
169000
3000
त्या सहज कळतील? विश्वामध्ये अशा गोष्टी आहेत का,
03:18
that are, in principle, ungraspable by any mind,
46
173000
4000
ज्या तत्वत: कितीही सर्वोत्तम बुद्धीच्या आकलनशक्तीच्याही
03:22
however superior?
47
177000
2000
पलीकडे असतील?
03:25
The history of science has been one long series
48
180000
3000
विज्ञानाचा इतिहास म्हणजे विचारांच्या विराट घुसळणींची
03:28
of violent brainstorms, as successive generations
49
183000
3000
(ब्रेनस्टॉर्मिंगची)एक मालिकाच आहे. प्रत्येक नवी पिढी विश्वातल्या
03:32
have come to terms with increasing levels of queerness
50
187000
3000
चढत्या भाजणीने विचित्र वाटत जाणाऱ्या गोष्टींचं अस्तित्व
03:35
in the universe.
51
190000
1000
मान्य करत आली आहे.
03:37
We're now so used to the idea that the Earth spins --
52
192000
2000
आता ’पृथ्वी स्वत:भोवती फिरते आणि सूर्य आकाशात या टोकाकडून त्या टोकाकडे जात नाही’
03:40
rather than the Sun moves across the sky -- it's hard for us to realize
53
195000
3000
या संकल्पनेची आपल्याला इतकी सवय झाली आहे, की ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात आली ती वेळ म्हणजे
03:43
what a shattering mental revolution that must have been.
54
198000
3000
केवढी मोठी वैचारिक क्रांती असेल त्याची कल्पना करणं आपल्याला कठीण जातं.
03:47
After all, it seems obvious that the Earth is large and motionless,
55
202000
3000
किती झालं तरी पृथ्वी खूप मोठ्ठी आणि स्थिर आहे आणि
03:51
the Sun small and mobile. But it's worth recalling
56
206000
4000
सूर्य अगदीच लहान आणि फिरता आहे हे डोळ्यांना ढळढळीतपणे दिसत असतं.
03:55
Wittgenstein's remark on the subject.
57
210000
1000
पण या विषयावरची (तत्त्वज्ञ) विटगनस्टाइनची टिप्पणी मोठी मार्मिक आहे.
03:57
"Tell me," he asked a friend, "why do people always say, it was natural
58
212000
5000
ते एका मित्राला म्हणाले, "मला असं सांग, माणसाला ’पृथ्वी स्वतःभोवती फिरते’ याच्याऐवजी
04:02
for man to assume that the sun went round the earth
59
217000
3000
’सूर्य पृथ्वीभोवती फिरतो’ असं वाटणं जास्त साहजिक आहे
04:05
rather than that the earth was rotating?"
60
220000
2000
असं लोक का म्हणतात?"
04:09
His friend replied, "Well, obviously because it just looks as though
61
224000
3000
त्यांचा मित्र म्हणाला, "अरे, सोप्पं आहे. कारण सूर्य पृथ्वीभोवती फिरतो
04:12
the Sun is going round the Earth."
62
227000
2000
हे सरळ सरळ दिसतंच की आपल्याला रोज."
04:15
Wittgenstein replied, "Well, what would it have looked like
63
230000
3000
विटगनस्टाइन म्हणाले, "मग ’पृथ्वी स्वत:भोवती फिरते’ हे दिसायचं झालं तर
04:18
if it had looked as though the Earth was rotating?" (Laughter)
64
233000
8000
ते नक्की कसं दिसलं असतं ते सांग बरं!" (हशा)
04:27
Science has taught us, against all intuition,
65
242000
2000
आपल्या अंतःप्रेरणेच्या (इन्ट्यूशन) विरोधात जाऊन विज्ञानाने आपल्याला असं शिकवलंय
04:30
that apparently solid things, like crystals and rocks,
66
245000
3000
की दगड, स्फटिक अशा सगळ्या ’सघन’ भासणाऱ्या गोष्टी खरं म्हणजे
04:33
are really almost entirely composed of empty space.
67
248000
4000
जवळजवळ संपूर्णपणे रिकाम्या जागेने, अवकाशाने व्यापलेल्या असतात.
04:37
And the familiar illustration is the nucleus of an atom is a fly
68
252000
5000
त्यासाठी नेहमी वापरली जाणारी प्रतिमाही आपल्या ओळखीची आहे :
04:43
in the middle of a sports stadium and the next atom
69
258000
2000
अणुकेंद्रक हे एखाद्या खेळाच्या मोठ्ठ्या मैदानाच्या मध्यभागी असलेल्या माशीएवढं असतं,
04:46
is in the next sports stadium.
70
261000
1000
आणि त्या माशीच्या जवळची दुसरी माशी ही दुसऱ्या मैदानात असते.
04:49
So it would seem the hardest, solidest, densest rock
71
264000
2000
म्हणजेच कठीणात कठीण, सघनतम खडक हा खरं तर जवळपास पूर्णच रिकाम्या जागेचा बनलेला असतो,
04:52
is really almost entirely empty space, broken only by tiny particles
72
267000
5000
आणि त्या जागेत भर घालणारे कण इतके सूक्ष्म आणि एकमेकांपासून इतक्या दूरवर असतात,
04:58
so widely spaced they shouldn't count.
73
273000
2000
की त्यांनी त्या रिकामपणात काहीच फरक पडू नये.
05:01
Why, then, do rocks look and feel solid and hard and impenetrable?
74
276000
3000
मग खडक इतके कठीण, घन आणि अभेद्य का दिसतात? हाताळायलाही तसेच का वाटतात?
05:06
As an evolutionary biologist, I'd say this: our brains have evolved
75
281000
4000
एक उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ या भूमिकेतून मी असं म्हणेन: आपलं शरीर ज्या आकार आणि वेगांच्या
05:11
to help us survive within the orders of magnitude of size and speed
76
286000
5000
पातळीवर काम करत असतं, त्याच पातळीवरच्या मोजमापांमध्ये आपल्याला तगवण्यासाठी आपला मेंदू
05:17
which our bodies operate at. We never evolved to navigate
77
292000
3000
उत्क्रांत झालेला आहे. अणूंच्या जगात वावरण्यासाठी आपली उत्क्रांती
05:21
in the world of atoms.
78
296000
1000
कधीच झाली नाही.
05:22
If we had, our brains probably would perceive rocks
79
297000
3000
तशी ती झाली असती, तर आपल्या मेंदूने ’दगड रिकाम्या जागेने भरलेले असतात’
05:25
as full of empty space. Rocks feel hard and impenetrable
80
300000
4000
अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिलं असतं. दगड आपल्या हातांना कठीण आणि अभेद्य वाटतात
05:29
to our hands precisely because objects like rocks and hands
81
304000
4000
याचं कारण हात दगडांमधून आरपार जाऊ शकत नाहीत हेच आहे.
05:34
cannot penetrate each other. It's therefore useful
82
309000
4000
त्यामुळे ’सघनता’, ’अभेद्यपणा’ अशा कल्पना रचणं
05:38
for our brains to construct notions like "solidity" and "impenetrability,"
83
313000
6000
आपल्या मेंदूसाठी उपयोगाचं असतं, कारण अशा संकल्पनांमुळे,
05:44
because such notions help us to navigate our bodies through
84
319000
4000
आपला ज्या मध्यम-आकाराच्या जगात वावर होत असतो
05:48
the middle-sized world in which we have to navigate.
85
323000
4000
तिथे हालचाली करायला आपल्याला मदत होते.
05:52
Moving to the other end of the scale, our ancestors never had to
86
327000
3000
या मोजमापांच्या पट्टीच्या दुसऱ्या टोकाला जायचं म्हटलं, तर आपल्या पूर्वजांना
05:56
navigate through the cosmos at speeds close to
87
331000
3000
कधीच अंतराळातून प्रकाशाच्या वेगाच्या जवळ जाणाऱ्या गतीने प्रवास करावा लागला नव्हता.
05:59
the speed of light. If they had, our brains would be much better
88
334000
3000
जर त्यांना तसं करावं लागलं असतं, तर आपल्या मेंदूंना आइनस्टाइन फार चांगल्या पद्धतीनं
06:03
at understanding Einstein. I want to give the name "Middle World"
89
338000
5000
कळला असता. आपण या ज्या मध्यम पटीतली मोजमापं असलेल्या वातावरणात नांदण्यासाठी
06:08
to the medium-scaled environment in which we've evolved
90
343000
3000
उत्क्रांत झालो आहोत, त्याला ’मधलं जग’ असं नाव द्यावंसं मला वाटतं.
06:11
the ability to take act -- nothing to do with Middle Earth.
91
346000
2000
याचा (जे. आर. आर. टॉलकिन या लेखकाच्या कल्पनेतल्या) ’मधल्या पृथ्वी’शी
06:13
Middle World. (Laughter)
92
348000
3000
काहीएक संबंध नाही. मधलं जग. (हशा)
06:17
We are evolved denizens of Middle World, and that limits
93
352000
4000
आपण या ’मधल्या जगा’तले उत्क्रांत रहिवासी आहोत, आणि त्यामुळेच
06:21
what we are capable of imagining. We find it intuitively easy
94
356000
3000
आपल्या कल्पनाशक्तीला मर्यादा पडतात. आपल्याला आपल्या पातळीवरची एखादी कल्पना समजणं
06:25
to grasp ideas like, when a rabbit moves at the sort of
95
360000
2000
निसर्गतःच सोपं जातं, उदाहरणार्थ : जर एखादा ससा, या मधल्या जगातले ससे आणि इतर वस्तू ज्या
06:28
medium velocity at which rabbits and other Middle World objects move,
96
363000
3000
मध्यम गतीच्या पटीत वाटचाल करतात त्या गतीने पळाला आणि एखाद्या खडकासारख्या
06:32
and hits another Middle World object, like a rock, it knocks itself out.
97
367000
3000
दुसऱ्या एखाद्या मधल्या-जगातल्या वस्तूवर आदळला तर तो बेशुद्ध होईल.
06:38
May I introduce Major General Albert Stubblebine III,
98
373000
5000
आता मला तुमच्याशी एका व्यक्तीची ओळख करून द्यायचीय: ते म्हणजे १९८३ साली अमेरिकन सैन्याच्या
06:44
commander of military intelligence in 1983.
99
379000
3000
गुप्तहेर खात्याचे प्रमुख असलेले मेजर जनरल अल्बर्ट स्टबलबाइन (तिसरे).
06:49
He stared at his wall in Arlington, Virginia, and decided to do it.
100
384000
4000
त्यांनी व्हर्जिनियातल्या आर्लिंग्टनमधल्या आपल्या कार्यालयाच्या भिंतीकडे रोखून बघायला सुरुवात केली, आणि ठरवलं:
06:54
As frightening as the prospect was, he was going into the next office.
101
389000
4000
ऐकायला कितीही भीतीदायक वाटत असलं, तरी ते भिंत भेदून पलीकडच्या खोलीत जाणारच होते.
07:00
He stood up, and moved out from behind his desk.
102
395000
3000
ते उठले, आणि आपल्या टेबलामागून उठून समोर आले.
07:05
What is the atom mostly made of? he thought. Space.
103
400000
3000
’अणू मुख्यतः कशापासून बनलेले असतात?’ त्यांनी विचार केला. मोकळ्या जागेपासून.
07:09
He started walking. What am I mostly made of? Atoms.
104
404000
5000
त्यांनी चालायला सुरुवात केली. मी मुख्यतः कशापासून बनलो आहे? अणूंपासून.
07:15
He quickened his pace, almost to a jog now.
105
410000
2000
त्यांनी चालण्याची गती वाढवत हळूहळू धावायला सुरुवात केली.
07:18
What is the wall mostly made of? Atoms.
106
413000
4000
भिंत मुख्यतः कशाची बनलेली आहे? अणूंची.
07:23
All I have to do is merge the spaces.
107
418000
3000
आता मला फक्त इतकंच करायचं आहे, की या सगळ्या मोकळ्या जागा एकत्र जोडून टाकायच्या आहेत!
07:27
Then, General Stubblebine banged his nose hard on the wall
108
422000
5000
आणि मग, जनरल स्टबलबाइनचं नाक खूप जोरात त्यांच्या खोलीच्या भिंतीवर आदळलं.
07:32
of his office. Stubblebine, who commanded 16,000 soldiers,
109
427000
5000
सोळा हजार सैनिकांवर हुकूम गाजवणाऱ्या स्टबलबाइनना स्वतःच्या
07:38
was confounded by his continual failure to walk through the wall.
110
433000
3000
या भिंतीमधून चालत जाता येण्यातल्या सततच्या अपयशाने पुरतं गोंधळून टाकलं होतं.
07:42
He has no doubt that this ability will, one day, be a common tool
111
437000
3000
एके दिवशी ही अशी क्षमता म्हणजे त्यांच्या सैन्याच्या शस्त्रागारातलं नेहमीचं हत्यार होऊन जाईल
07:45
in the military arsenal. Who would screw around with an army
112
440000
3000
याबद्दल त्यांना मुळीच शंका नव्हती. भिंती भेदून आरपार जाऊ शकणाऱ्या सेनेला
07:48
that could do that? That's from an article in Playboy,
113
443000
4000
कोण डिवचायला जाईल? हा किस्सा ’प्लेबॉय’मधल्या एका लेखात होता.
07:53
which I was reading the other day. (Laughter)
114
448000
3000
परवाच वाचत होतो मी तो लेख. (हशा)
07:56
I have every reason to think it's true; I was reading Playboy
115
451000
2000
या लेखावर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे खूप कारणं आहेत; एक तर मी प्लेबॉय वाचत होतो
07:59
because I, myself, had an article in it. (Laughter)
116
454000
8000
कारण माझा स्वत:चा एक लेखही त्यात होता. (हशा)
08:07
Unaided human intuition schooled in Middle World
117
462000
4000
बाहेरून काहीच मदत नसलेल्या आणि मधल्या जगात शिकलेल्या
08:12
finds it hard to believe Galileo when he tells us
118
467000
3000
मानवी अंतःप्रेरणेला ’हवेचं घर्षण नसेल तर उंचावरून एकाच वेळी टाकलेल्या
08:15
a heavy object and a light object, air friction aside,
119
470000
3000
जड आणि हलक्या वस्तू एकाच वेळी जमिनीवर पडतील’ असं सांगणाऱ्या
08:19
would hit the ground at the same instant.
120
474000
1000
गॅलिलियोवर विश्वास ठेवणं कठीण जातं.
08:20
And that's because in Middle World, air friction is always there.
121
475000
4000
आणि याचं कारण इतकंच की मधल्या जगात हवा आणि तिच्यामुळे निर्माण होणारं घर्षण नेहमीच हजर असतं.
08:24
If we'd evolved in a vacuum, we would expect them
122
479000
2000
जर आपण निर्वात (व्हॅक्यूम) ठिकाणी उत्क्रांत झालो असतो तर आपण
08:27
to hit the ground simultaneously. If we were bacteria,
123
482000
3000
त्या वस्तू एकाच वेळी जमिनीवर पडतील अशीच अपेक्षा केली असती. आपण जीवाणू असतो,
08:30
constantly buffeted by thermal movements of molecules,
124
485000
3000
आणि सतत रेणूंच्या उष्णतेमुळे होणाऱ्या हालचालींच्या धक्काबुक्कीत सापडलो असतो,
08:33
it would be different,
125
488000
1000
तर गोष्ट वेगळी असती,
08:35
but we Middle Worlders are too big to notice Brownian motion.
126
490000
3000
पण आत्ता तरी आपण मधले जगवाले इतके मोठे आहोत की आपल्याला ’ब्राउनियन गती’ जाणवतच नाही.
08:39
In the same way, our lives are dominated by gravity
127
494000
3000
तसंच, आपल्या रोजच्या जगण्यात गुरुत्वाकर्षणाचा खूपच प्रभाव पडत असला
08:42
but are almost oblivious to the force of surface tension.
128
497000
3000
तरी आपल्याला पृष्ठताण (सरफेस टेन्शन) जवळजवळ अजिबात जाणवत नाही.
08:46
A small insect would reverse these priorities.
129
501000
2000
एखाद्या छोट्याशा कीटकासाठी हाच प्राधान्यक्रम बरोब्बर उलटा असेल.
08:50
Steve Grand -- he's the one on the left,
130
505000
2000
स्टीव्ह ग्रॅन्ड -- डावीकडचे,
08:52
Douglas Adams is on the right -- Steve Grand, in his book,
131
507000
3000
(उजवीकडचे आहेत ते डग्लस ऍडम्स) -- स्टीव्ह ग्रॅन्ड त्यांच्या ’क्रिएशन: लाइफ़ ऍन्ड हाउ वी मेक इट’
08:55
"Creation: Life and How to Make It," is positively scathing
132
510000
4000
(निर्मिती: आयुष्य आणि आपण ते कसं निर्माण करतो) या पुस्तकात आपल्या
08:59
about our preoccupation with matter itself.
133
514000
3000
द्रव्यवस्तूं(मॅटर)मध्येच गुंतून राहण्यावर परखड टीका करतात.
09:03
We have this tendency to think that only solid, material things
134
518000
4000
फक्त समूर्त, सहज जाणवणारे पदार्थ ह्याच खऱ्या ’वस्तू’ आहेत असा विचार करण्याकडे
09:07
are really things at all. Waves of electromagnetic fluctuation
135
522000
5000
आपला कल असतो. निर्वातातल्या विद्युतचुंबकीय लहरी (इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज्‌)
09:12
in a vacuum seem unreal.
136
527000
2000
आपल्याला ’खऱ्या’ वाटत नाहीत.
09:15
Victorians thought the waves had to be waves in some material medium:
137
530000
4000
व्हिक्टोरियन जमान्यातल्या लोकांना वाटे की या लहरी नक्कीच कुठल्यातरी सघन माध्यमात असल्या पाहिजेत -
09:20
the ether. But we find real matter comforting only because
138
535000
4000
- त्याला त्यांनी नाव दिलं ’ईथर’. पण आपल्याला खरे द्रव्यपदार्थ चटकन कळतात कारण
09:24
we've evolved to survive in Middle World,
139
539000
3000
आपण मधल्या जगात जगण्यासाठी उत्क्रांत झालो आहोत.
09:28
where matter is a useful fiction.
140
543000
2000
इथे द्रव्यवस्तू ही एक उपयोगी संकल्पना आहे.
09:31
A whirlpool, for Steve Grand, is a thing with just as much reality
141
546000
3000
स्टीव्ह ग्रॅन्डच्या मते ’पाण्यातला भोवरा’ हीदेखील एखाद्या दगडाइतकीच
09:35
as a rock.
142
550000
1000
खरी वस्तू आहे.
09:38
In a desert plain in Tanzania, in the shadow of the volcano
143
553000
4000
टान्झानियाच्या वाळवंटात, ’ओल डोन्यो लेन्गाई’ नावाच्या ज्वालामुखी पर्वतापाशी
09:42
Ol Donyo Lengai, there's a dune made of volcanic ash.
144
557000
3000
ज्वालामुखीय राखेची एक प्रचंड ढिगाऱ्यासारखी टेकडी (ड्यून) आहे.
09:46
The beautiful thing is that it moves bodily.
145
561000
3000
गमतीची गोष्ट म्हणजे ही टेकडी सबंध हलते.
09:50
It's what's technically known as a "barchan," and the entire dune
146
565000
3000
अशा भूभागांना ’बार्चन’ म्हणतात, आणि अशी अख्खीच्या अख्खी टेकडी
09:53
walks across the desert in a westerly direction
147
568000
3000
त्या वाळवंटातून वर्षाला सुमारे सतरा मीटर या गतीने
09:56
at a speed of about 17 meters per year.
148
571000
3000
पश्चिम दिशेकडे सरपटत जाते.
10:00
It retains its crescent shape and moves in the direction of the horns.
149
575000
4000
तिचा चंद्रकोरीसारखा आकार कायम राहतो आणि त्या कोरीच्या टोकांच्या दिशेत टेकडी हलते.
10:04
What happens is that the wind blows the sand
150
579000
2000
होतं असं, की वाऱ्यामुळे वाळू त्या उथळ उतारावरून
10:07
up the shallow slope on the other side, and then,
151
582000
2000
पलीकडच्या बाजूला फेकली जाते, आणि जसजसा वाळूचा एक एक कण
10:10
as each sand grain hits the top of the ridge,
152
585000
1000
त्या उतरणीच्या वरच्या कड्यावर आदळतो तसतसा
10:11
it cascades down on the inside of the crescent,
153
586000
2000
तो घरंगळत त्या चंद्रकोरीच्या आतल्या बाजूला उतरतो.
10:14
and so the whole horn-shaped dune moves.
154
589000
3000
अशा तर्‍हेनं ती शिंगासारखी वाकलेली अख्खी टेकडी हलते.
10:20
Steve Grand points out that you and I are, ourselves,
155
595000
2000
स्टीव्ह ग्रॅन्ड आपल्या असं लक्षात आणून देतात, की तुम्ही-आम्ही सगळेच
10:23
more like a wave than a permanent thing.
156
598000
2000
शाश्वत वस्तूंसारखे कमी आणि लहरींसारखे जास्त आहोत.
10:27
He invites us, the reader, to "think of an experience
157
602000
3000
ते आपल्यासारख्या वाचकाला सांगतात, "तुमच्या लहानपणचा एखादा
10:30
from your childhood -- something you remember clearly,
158
605000
2000
अनुभव आठवा -- असं काहीतरी, जे तुम्हांला फार स्पष्टपणे आठवतंय,
10:33
something you can see, feel, maybe even smell,
159
608000
2000
जे तुम्हांला दिसतंय, जाणवतंय, कदाचित त्याचा वासही येतोय -
10:36
as if you were really there.
160
611000
1000
इतकं, की जणूकाही तुम्ही खरोखरच तिथे आहात.
10:37
After all, you really were there at the time, weren't you?
161
612000
4000
मग काय, तुम्ही त्या वेळी खरोखरीचे तिथे होतात, बरोबर ना?
10:41
How else would you remember it?
162
616000
1000
नाहीतर तुम्हांला ते कसं आठवलं असतं?
10:43
But here is the bombshell: You weren't there.
163
618000
2000
पण आता एक धक्कादायक गोष्ट ऐका: तुम्ही तिथे नव्हताच.
10:46
Not a single atom that is in your body today was there
164
621000
3000
आज तुमच्या शरीरात असलेला एकही अणू त्या प्रसंगी तिथे हजर नव्हता.
10:49
when that event took place. Matter flows from place to place
165
624000
4000
द्रव्यपदार्थ एका जागेहून दुसऱ्या जागी वाहत असतात, आणि
10:53
and momentarily comes together to be you.
166
628000
2000
फक्त काही काळासाठी ’तुम्ही’ बनून एकत्र येतात.
10:56
Whatever you are, therefore, you are not the stuff
167
631000
2000
त्यामुळेच तुम्ही कुणीही असाल, पण ज्या पदार्थांपासून तुम्ही बनला आहात
10:59
of which you are made.
168
634000
1000
ते म्हणजे तुम्ही नक्कीच नव्हेत.
11:02
If that doesn't make the hair stand up on the back of your neck,
169
637000
2000
जर हे वाचून तुमच्या अंगावर काटा आला नसेल
11:04
read it again until it does, because it is important."
170
639000
3000
तर तसं होईपर्यंत ते पुन्हा पुन्हा वाचा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे."
11:09
So "really" isn't a word that we should use with simple confidence.
171
644000
4000
त्यामुळे ’खरोखर’ हा शब्द आपण ठाम विश्वासाने वापरायला नको.
11:14
If a neutrino had a brain,
172
649000
2000
जर न्यूट्रिनोला त्याच्याच आकाराच्या
11:16
which it evolved in neutrino-sized ancestors,
173
651000
2000
पूर्वजांपासून उत्क्रांत झालेला मेंदू असता तर तो म्हणाला असता,
11:19
it would say that rocks really do consist of empty space.
174
654000
3000
’दगड हे खरोखरच मोकळ्या जागेपासून बनलेले असतात.’
11:24
We have brains that evolved in medium-sized ancestors
175
659000
2000
आपले मेंदू मध्यम-आकाराच्या पूर्वजांपासून उत्क्रांत झाले.
11:26
which couldn't walk through rocks.
176
661000
2000
त्या पूर्वजांना दगडांमधून आरपार चालत जाता येत नव्हते.
11:29
"Really," for an animal, is whatever its brain needs it to be
177
664000
4000
एखाद्या प्राण्यासाठी "खरोखर" असलेली बाब म्हणजे त्याला जगात टिकून राहायला मदत व्हावी
11:33
in order to assist its survival,
178
668000
2000
म्हणून त्याच्या मेंदूने रचलेली कोणतीही गोष्ट.
11:36
and because different species live in different worlds,
179
671000
2000
आणि प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या ’जगा’त राहात असल्यामुळे
11:39
there will be a discomforting variety of "really"s.
180
674000
3000
"खरोखरी"च्या गोष्टींमध्येही आपण हबकून जाऊ इतकं वैविध्य असणार.
11:45
What we see of the real world is not the unvarnished world
181
680000
4000
आपल्याला जे ’खरं’ जग दिसतं ती जगाची मूळ आवृत्ती नसून
11:49
but a model of the world, regulated and adjusted by sense data,
182
684000
4000
त्याच्या आकृतीचा एक नमुना (मॉडेल) आहे. या मॉडेलचं नियमन आणि पुनर्रचना ज्ञानेंद्रियांमधून मिळालेल्या माहितीनुसार होत असते,
11:54
but constructed so it's useful for dealing with the real world.
183
689000
3000
पण त्याची उभारणी नेहमीच अशा पद्धतीने होते जेणेकरून आपल्यापुरत्या ’खऱ्या’ जगाशी सामना करताना ते उपयोगी ठरावं.
11:58
The nature of the model depends on the kind of animal we are.
184
693000
3000
या मॉडेलचं स्वरूप आपण कोणत्या प्रकारचे प्राणी आहोत त्यावर ठरतं.
12:02
A flying animal needs a different kind of model
185
697000
2000
उडणाऱ्या प्राण्याला चालणाऱ्या, झाडावर चढणाऱ्या किंवा पोहणाऱ्या
12:05
from a walking, climbing or swimming animal.
186
700000
3000
प्राण्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या मॉडेलची गरज असते
12:08
A monkey's brain must have software capable of simulating
187
703000
4000
माकडाच्या मेंदूमध्ये फांद्या आणि खोडांचे त्रिमित (थ्री-डी) जग
12:13
a three-dimensional world of branches and trunks.
188
708000
2000
उभं करू शकणारं आज्ञांकन (सॉफ्टवेअर) असायलाच हवं.
12:16
A mole's software for constructing models of its world
189
711000
3000
घुशीच्या डोक्यातलं जगाचं मॉडेल बनवणारं सॉफ्टवेअर खास
12:19
will be customized for underground use.
190
714000
3000
जमिनीखालच्या वापराकरता बनवलेलं असणार.
12:22
A water strider's brain doesn't need 3D software at all,
191
717000
4000
पाणकिड्याच्या (वॉटर स्ट्रायडर) मेंदू्ला त्रिमित आज्ञांकनाची अजिबातच गरज नाही,
12:26
since it lives on the surface of the pond
192
721000
2000
कारण तो डबक्याच्या पृष्टभागावर राहतो -
12:28
in an Edwin Abbott flatland.
193
723000
2000
एडविन एबटनी ’फ्लॅटलॅन्ड’ कादंबरीत वर्णन केलंय तशा सपाट जगात.
12:32
I've speculated that bats may see color with their ears.
194
727000
4000
माझा असा अंदाज आहे की वटवाघळं त्यांच्या कानांनी रंग पाहात असावीत.
12:37
The world model that a bat needs in order to navigate
195
732000
3000
वटवाघुळाला त्रिमित परिसरात योग्य वाटचाल करत
12:40
through three dimensions catching insects
196
735000
2000
किडे पकडण्यासाठी जगाच्या ज्या प्रकारच्या मॉडेलची गरज असते
12:42
must be pretty similar to the world model that any flying bird,
197
737000
3000
तशाच प्रकारचं मॉडेल कुठल्याही उडणाऱ्या पक्ष्याला,
12:45
a day-flying bird like a swallow, needs to perform
198
740000
3000
उदाहरणार्थ चिमणीसारख्या दिनचर पक्ष्याला
12:48
the same kind of tasks.
199
743000
1000
त्याच प्रकारची कामं करण्यासाठी हवं असतं.
12:50
The fact that the bat uses echoes in pitch darkness
200
745000
2000
त्या मॉडेलमध्ये ताजी माहिती (चल मानकं / व्हॅरिएबल्स) भरायला वटवाघूळ
12:53
to input the current variables to its model,
201
748000
2000
ठार अंधारात प्रतिध्वनींचा वापर करतं आणि चिमणी प्रकाशाचा वापर करते
12:56
while the swallow uses light, is incidental.
202
751000
2000
इतकाच काय तो प्रसंगोत्पात (इन्सिडेन्टल) पडलेला फरक.
12:59
Bats, I've even suggested, use perceived hues, such as red and blue,
203
754000
5000
मी तर असंही सुचवलं होतं की वटवाघुळं त्यांना जाणवलेल्या लाल, निळा अशा रंगछटांचा वापर
13:04
as labels, internal labels, for some useful aspect of echoes --
204
759000
6000
प्रतिध्वनीच्या कुठल्यातरी महत्त्वाच्या पैलूसाठीची खाजगी लेबलं म्हणून करत असावीत --
13:11
perhaps the acoustic texture of surfaces, furry or smooth and so on,
205
766000
4000
कदाचित पृष्ठभागांचा आवाजानुसारचा पोत (टेक्श्चर) कसा आहे : केसाळ, गुळगुळीत किंवा आणखी कसा त्यासाठी.
13:15
in the same way as swallows or, indeed, we, use those
206
770000
4000
ज्या पद्धतीनं चिमण्या किंवा खरंतर आपण मनुष्यप्राणीदेखील
13:19
perceived hues -- redness and blueness etc. --
207
774000
2000
आपल्याला जाणवलेल्या त्या तांबडेपणा, निळेपणा वगैरे रंगछटा
13:22
to label long and short wavelengths of light.
208
777000
2000
प्रकाशाच्या लांब किंवा आखूड तरंगलांबीला लेबलं द्यायला वापरतो तसंच.
13:24
There's nothing inherent about red that makes it long wavelength.
209
779000
3000
लाल रंगामध्ये त्याला ’जास्त तरंगलांबी’ देणारी कोणतीही मूलभूत गोष्ट नाही.
13:29
And the point is that the nature of the model is governed by
210
784000
2000
मुद्दा एवढाच, की एखाद्या मॉडेलचं स्वरूप हे त्याचा उपयोग कसा होणार आहे यावर अवलंबून असतं,
13:31
how it is to be used, rather than by the sensory modality involved.
211
786000
5000
त्यासाठी कोणती ज्ञानेंद्रियं आणि जाणिवा वापरल्या जातात यावर नव्हे.
13:38
J. B .S. Haldane himself had something to say about animals
212
793000
2000
खुद्द जे. बी. एस्‌. हॉल्डेननीही गंधाच्या अधिराज्यात जगणाऱ्या
13:41
whose world is dominated by smell.
213
796000
2000
प्राण्यांबद्दल सांगितलं होतं.
13:44
Dogs can distinguish two very similar fatty acids, extremely diluted:
214
799000
5000
कुत्र्यांना एकमेकांसारखी असलेली दोन तैल-आम्लं (फॅटी ऍसिड्स) अगदी विरल (डायल्यूटेड) असली तरी वेगळी ओळखता येतात :
13:49
caprylic acid and caproic acid.
215
804000
3000
कॅप्रिलिक ऍसिड आणि कॅप्रोइक ऍसिड.
13:52
The only difference, you see, is that one has an extra pair of
216
807000
3000
या दोन आम्लांमधला फरक इतकाच की एका आम्लातल्या कार्बन अणूंच्या साखळीत दुसऱ्यापेक्षा
13:55
carbon atoms in the chain.
217
810000
1000
दोन कार्बन जास्त आहेत.
13:57
Haldane guesses that a dog would probably be able to place the acids
218
812000
4000
हॉल्डेनच्या अंदाजाने, एखाद्या कुत्र्याला वेगवेगळ्या आम्लांचा वास घेऊन ती त्यांच्या रेणवीय वस्तुमानांच्या
14:01
in the order of their molecular weights by their smells,
219
816000
3000
(मॉलेक्युलर वेट) क्रमात लावता येतील.
14:05
just as a man could place a number of piano wires
220
820000
2000
(जसं एखाद्या माणसाला पियानोच्या पट्ट्यांमधून निघणारे ध्वनी ऐकून
14:08
in the order of their lengths by means of their notes.
221
823000
2000
त्यांना त्यांच्या तारांच्या कमी-जास्त लांबीनुसार क्रमात लावता येईल.)
14:12
Now, there's another fatty acid, capric acid,
222
827000
3000
कॅप्रिक ऍसिड नावाचं अजून एक फॅटी ऍसिड आहे
14:16
which is just like the other two,
223
831000
1000
- आधीच्या दोघांसारखंच, फक्त त्यात
14:17
except that it has two more carbon atoms.
224
832000
2000
अजून दोन कार्बन अणू जास्त आहेत.
14:20
A dog that had never met capric acid would, perhaps,
225
835000
3000
कॅप्रिक ऍसिडशी कधीही गाठभेट न घडलेल्या एखाद्या कुत्र्याला
14:23
have no more trouble imagining its smell than we would have trouble
226
838000
4000
त्याच्या वासाची कल्पना करता येणं हे कदाचित आपल्याला ट्रम्पेटवर आपण पूर्वी ऐकलेल्या
14:28
imagining a trumpet, say, playing one note higher
227
843000
3000
स्वराहून वरच्या एका स्वराची कल्पना करता
14:31
than we've heard a trumpet play before.
228
846000
2000
येण्याइतपतच अडचणीचं आहे.
14:36
Perhaps dogs and rhinos and other smell-oriented animals
229
851000
4000
कदाचित कुत्रे, गेंडे आणि घ्राणेंद्रियं तीक्ष्ण असलेले इतर प्राणी वासावरूनच
14:41
smell in color. And the argument would be
230
856000
3000
रंग ओळखत असतील. आणि यामागचं तर्कशास्त्रही
14:44
exactly the same as for the bats.
231
859000
1000
तंतोतंत वटवाघळांच्या उदाहरणासारखंच आहे.
14:48
Middle World -- the range of sizes and speeds
232
863000
3000
मधलं जग -- म्हणजे उत्क्रांतीमुळे ज्या आकार आणि वेगांच्या मर्यादा
14:52
which we have evolved to feel intuitively comfortable with --
233
867000
3000
आपल्याला आपसूकच सवयीच्या वाटतात -- ते जग म्हणजे आपल्याला
14:55
is a bit like the narrow range of the electromagnetic spectrum
234
870000
4000
इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा थोडासाच भाग जसा वेगवेगळ्या रंगांच्या दृश्य प्रकाशाच्या स्वरूपात दिसतो,
14:59
that we see as light of various colors.
235
874000
3000
तसंच आहे.
15:02
We're blind to all frequencies outside that,
236
877000
2000
दृश्य प्रकाशाखेरीज इतर कुठल्याही वारंवारितेच्या लहरी आपल्याला
15:04
unless we use instruments to help us.
237
879000
3000
काही खास उपकरणं वापरल्याशिवाय ’दिसत’ नाहीत.
15:09
Middle World is the narrow range of reality
238
884000
3000
’मधलं जग’ हा ’खऱ्या’ जगाचा छोटासा तुकडा आहे.
15:12
which we judge to be normal, as opposed to the queerness
239
887000
3000
हा छोटा तुकडा आपल्याला ठीकठाक, साधारण वाटतो आणि
15:15
of the very small, the very large and the very fast.
240
890000
3000
अतिसूक्ष्म, अतिप्रचंड आणि अतिवेगवान गोष्टी ’विचित्र’ वाटतात.
15:20
We could make a similar scale of improbabilities;
241
895000
2000
आपण ’असंभाव्य’पणाची अशीच मोजपट्टी तयार करू शकतो;
15:23
nothing is totally impossible.
242
898000
2000
कोणतीही गोष्ट पूर्णतः अशक्य नसते.
15:25
Miracles are just events that are extremely improbable.
243
900000
3000
’चमत्कार’ म्हणजे अत्यंत असंभाव्य घटना असतात इतकंच.
15:29
A marble statue could wave its hand at us; the atoms that make up
244
904000
4000
एखादा संगमरवरी पुतळा आपल्याला पाहून हात हलवू शकतो; तशीही
15:33
its crystalline structure are all vibrating back and forth anyway.
245
908000
3000
त्याच्या स्फटिक-संरचनेमधल्या सगळ्या अणूंची पुढे-मागे आंदोलनं चालूच असतात.
15:37
Because there are so many of them,
246
912000
1000
पण त्या अणूंची संख्या खूपच मोठी असते,
15:39
and because there's no agreement among them
247
914000
1000
आणि त्यांच्या हालचालींच्या दिशांमध्ये कसलाही ताळमेळ नसतो -
15:41
in their preferred direction of movement, the marble,
248
916000
2000
त्यामुळे मधल्या जगात आपल्याला दिसणारा संगमरवर
15:44
as we see it in Middle World, stays rock steady.
249
919000
3000
हा दगडासारखाच निश्चल राहतो.
15:47
But the atoms in the hand could all just happen to move
250
922000
2000
पण कधीतरी त्या पुतळ्याच्या हातातले अणू एकाच वेळी एकाच दिशेने हलत आहेत
15:49
the same way at the same time, and again and again.
251
924000
3000
असं घडू शकतं, आणि एकदा नव्हे तर अनेकदा.
15:52
In this case, the hand would move and we'd see it waving at us
252
927000
4000
तसं झालं तर तो हात हलू शकतो आणि मधल्या जगातला तो पुतळा आपल्याकडे पाहून हात हलवतोय
15:56
in Middle World. The odds against it, of course, are so great
253
931000
4000
असं आपल्याला वाटू शकतं. अर्थात असं घडण्याची शक्यता इतकी कमी आहे,
16:00
that if you set out writing zeros at the time of
254
935000
3000
की शून्य पूर्णांक शून्य शून्य शून्य..अशा पद्धतीनं ती आकड्यात मांडायला गेलं,
16:03
the origin of the universe, you still would not have
255
938000
3000
तर विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी ती शून्यं लिहायला आपण बसलो तरी
16:06
written enough zeros to this day.
256
941000
1000
आजच्या या दिवसापर्यंत ती सगळी शून्यं लिहून संपणार नाहीत!
16:12
Evolution in Middle World has not equipped us to handle
257
947000
1000
मधल्या जगातल्या उत्क्रांतीने आपल्याला अत्यंत असंभाव्य घटना पचवणं शिकवलं नाहीये
16:13
very improbable events; we don't live long enough.
258
948000
2000
- आपण तितका जास्त काळ जगतच नाही.
16:16
In the vastness of astronomical space and geological time,
259
951000
4000
अंतराळाएवढी जागा आणि ग्रहांच्या जीवनचक्राएवढा काळ या अफाट जगामध्ये,
16:21
that which seems impossible in Middle World
260
956000
2000
मधल्या जगात अशक्य वाटणारी एखादी गोष्ट
16:24
might turn out to be inevitable.
261
959000
2000
कदाचित अटळ ठरेल.
16:28
One way to think about that is by counting planets.
262
963000
3000
या गोष्टीबद्दल विचार करायची एक पद्धत म्हणजे ग्रहांची मोजदाद करणं.
16:32
We don't know how many planets there are in the universe,
263
967000
1000
विश्वात एकूण ग्रह किती हे आपल्याला नक्की माहिती नाही,
16:34
but a good estimate is about 10 to the 20, or 100 billion billion.
264
969000
3000
पण अंदाजे दहा-वीस ते शंभर अब्ज अब्ज तरी असावेत.
16:38
And that gives us a nice way to express our estimate
265
973000
2000
आणि ही संख्या जीवसृष्टीच्या असंभाव्यतेबद्दलचा आपला अंदाज मांडायला
16:41
of life's improbability.
266
976000
2000
एक चांगला मार्ग ठरू शकते.
16:44
Could make some sort of landmark points
267
979000
2000
आपण नुकत्याच पाहिलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमसारखा
16:46
along a spectrum of improbability, which might look like
268
981000
3000
’असंभाव्यतेचा स्पेक्ट्रम’ बनवून त्याच्यावर
16:49
the electromagnetic spectrum we just looked at.
269
984000
3000
आपण काही महत्त्वाचे टप्पे दाखवू शकतो.
16:54
If life has arisen only once on any --
270
989000
2000
जर कुठेही जीवसृष्टी फक्त एकदाच निर्माण झाली असती --
16:58
if -- if life could -- I mean, life could originate once per planet,
271
993000
3000
होऊ शकली असती -- म्हणजे मला असं म्हणायचंय की जर प्रत्येक ग्रहावर जीवसृष्टीचा एकदा उगम झाला असता
17:01
could be extremely common, or it could originate once per star,
272
996000
4000
तर ती अगदीच सर्रास, कॉमन ठरली असती. ती एका ताऱ्यामागे एक या दराने, किंवा
17:06
or once per galaxy or maybe only once in the entire universe,
273
1001000
4000
एका आकाशगंगेमागे एक किंवा अख्ख्या विश्वात एक अशीच उगम पावली असती - तर
17:11
in which case it would have to be here. And somewhere up there
274
1006000
3000
(या शेवटच्या शक्यतेनुसार) ती स्पेक्ट्रममध्ये इथे असायला हवी. आणि त्या तिथे वर कुठेतरी
17:14
would be the chance that a frog would turn into a prince
275
1009000
2000
एखाद्या बेडकाचा राजपुत्र बनायची शक्यता असणार,
17:16
and similar magical things like that.
276
1011000
3000
किंवा तत्सम जादुई गोष्टी.
17:20
If life has arisen on only one planet in the entire universe,
277
1015000
3000
जर अख्ख्या विश्वात जीवसृष्टी फक्त एकाच ग्रहावर निर्माण झाली असेल
17:24
that planet has to be our planet, because here we are talking about it.
278
1019000
4000
तर तो आपलाच ग्रह असला पाहिजे, कारण आपण आत्ता इथे त्याबद्दल बोलत उभे आहोत.
17:28
And that means that if we want to avail ourselves of it,
279
1023000
2000
आणि याचाच अर्थ, जर आपल्याला तशी समजूत करून घ्यायची असेल तर
17:31
we're allowed to postulate chemical events in the origin of life
280
1026000
3000
शंभर अब्ज अब्जांमध्ये एक इतकी संभाव्यता असलेल्या रासायनिक प्रक्रिया
17:35
which have a probability as low as one in 100 billion billion.
281
1030000
3000
जीवसृष्टीच्या उगमाच्या वेळी घडल्या असा तर्क आपण मांडू शकतो.
17:39
I don't think we shall have to avail ourselves of that,
282
1034000
2000
पण आपल्याला तशी समजूत करून घ्यावी लागेल असं मला वाटत नाही,
17:42
because I suspect that life is quite common in the universe.
283
1037000
2000
कारण विश्वामध्ये सजीवसृष्टीचं अस्तित्व बऱ्यापैकी सर्रास असावं असा माझा अदमास आहे.
17:45
And when I say quite common, it could still be so rare
284
1040000
2000
आणि मी सर्रास असं म्हणतोय, तरीपण ते इतकं दुर्मीळ असू शकतं
17:48
that no one island of life ever encounters another,
285
1043000
3000
की जीवसृष्टीच्या कुठल्याही एका बेटाची दुसऱ्याशी कधीही गाठभेट होणार नाही.
17:52
which is a sad thought.
286
1047000
1000
हा जरा उदास करणारा विचार आहे.
17:55
How shall we interpret "queerer than we can suppose?"
287
1050000
2000
आता "आपल्याला वाटू शकतं त्याहूनही विचित्र" याचा अर्थ आपण कसा लावायचा?
17:58
Queerer than can in principle be supposed,
288
1053000
2000
म्हणजे तत्त्वतः, प्रत्यक्षात जे वाटू शकतं त्याहून विचित्र,
18:01
or just queerer than we can suppose, given the limitations
289
1056000
2000
की फक्त मधल्या जगात उत्क्रांत होताना आपल्या मेंदूवर पडलेल्या मर्यादांमुळे
18:04
of our brain's evolutionary apprenticeship in Middle World?
290
1059000
4000
आपल्याला वाटू शकतं त्याहून विचित्र?
18:09
Could we, by training and practice, emancipate ourselves
291
1064000
3000
आपण प्रशिक्षण आणि सरावाच्या जोरावर स्वतःला मधल्या जगातून
18:12
from Middle World and achieve some sort of intuitive,
292
1067000
2000
मुक्त करवून घेऊन अतिसूक्ष्म आणि अतिभव्य गोष्टींबद्दलचं
18:15
as well as mathematical, understanding of the very small
293
1070000
3000
एक आंतरिक आणि गणितीय ज्ञानही मिळवू शकतो का?
18:18
and the very large? I genuinely don't know the answer.
294
1073000
3000
मला खरोखरच याचं उत्तर माहिती नाही.
18:22
I wonder whether we might help ourselves to understand, say,
295
1077000
2000
मी कधीकधी विचार करतो की आपण आपल्याला पुंजसिद्धांत कळवून घ्यायला अशी मदत करू शकतो का :
18:25
quantum theory, if we brought up children to play computer games,
296
1080000
3000
म्हणजे समजा आपण आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून असे कॉम्प्युटर गेम्स खेळायला दिले
18:29
beginning in early childhood, which had a sort of
297
1084000
2000
ज्यात लुटूपुटूचं जग असेल. या जगात
18:32
make-believe world of balls going through two slits on a screen,
298
1087000
2000
एका पडद्यातल्या दोन खाचांमधून जाणारे चेंडू असतील,
18:34
a world in which the strange goings on of quantum mechanics
299
1089000
3000
पुंजभौतिकीत घडणाऱ्या चित्रविचित्र गोष्टी संगणकाद्वारे
18:37
were enlarged by the computer's make-believe,
300
1092000
3000
अजूनच मोठ्ठ्या करून दाखवल्या जातील,
18:40
so that they became familiar on the Middle-World scale of the stream.
301
1095000
3000
आणि मुलांना त्याच्या मधल्या जगातल्या परिमाणांची सवय होईल.
18:44
And, similarly, a relativistic computer game in which
302
1099000
3000
तसाच एखादा सापेक्षतावादी कॉम्प्युटर गेम तयार करायचा, ज्यात
18:47
objects on the screen manifest the Lorenz Contraction, and so on,
303
1102000
4000
पडद्यावरच्या वस्तूंचं लॉरेन्झ कॉन्ट्रॅक्शन होईल - वगैरे वगैरे-
18:52
to try to get ourselves into the way of thinking --
304
1107000
2000
आणि अशा पद्धतीनं आपण आपल्याला, आपल्या मुलांना
18:54
get children into the way of thinking about it.
305
1109000
2000
तसा विचार करायची सवय लावायचा प्रयत्न करू शकतो.
18:57
I want to end by applying the idea of Middle World
306
1112000
3000
मधल्या जगाची संकल्पनेचा वापर आपल्या एकमेकांबद्दलच्या जाणिवेकरता
19:01
to our perceptions of each other.
307
1116000
2000
करून मी हे भाषण संपवणार आहे.
19:04
Most scientists today subscribe to a mechanistic view of the mind:
308
1119000
3000
सध्या बहुसंख्य शास्त्रज्ञ मन यांत्रिक आहे या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतात:
19:08
we're the way we are because our brains are wired up as they are;
309
1123000
3000
आपण जसे आहोत तसे आहोत, कारण आपले मेंदू जसे घडले गेले आहेत तसे आहेत,
19:12
our hormones are the way they are.
310
1127000
1000
आपली संप्रेरकं जशी आहेत तशी आहेत.
19:13
We'd be different, our characters would be different,
311
1128000
2000
जर आपल्या मेंदूची संरचना आणि आपल्या शरीराचं रसायनशास्त्र
19:15
if our neuro-anatomy and our physiological chemistry were different.
312
1130000
4000
वेगळं असलं असतं तर आपणही वेगळे असलो असतो, आपली वैचारिक घडण वेगळी असली असती.
19:20
But we scientists are inconsistent. If we were consistent,
313
1135000
3000
पण आम्ही शास्त्रज्ञ लोक विसंगतही असतो. जर आमचे विचार सुसंगत असते,
19:24
our response to a misbehaving person, like a child-murderer,
314
1139000
3000
तर एखाद्या वाईट वागलेल्या, उदा. लहान मुलाचा खून केलेल्या व्यक्तीवरची आमची प्रतिक्रिया
19:27
should be something like, this unit has a faulty component;
315
1142000
3000
अशी असली असती: या यंत्राचा एक भाग बिघडला आहे;
19:30
it needs repairing. That's not what we say.
316
1145000
3000
त्याला दुरुस्तीची गरज आहे. पण आम्ही असं नाही म्हणत!
19:33
What we say -- and I include the most austerely mechanistic among us,
317
1148000
4000
आम्ही असं म्हणतो -- आणि या ’आम्ही’ मध्ये आमच्यातला अगदी सगळ्यात कर्मठ यांत्रिकतावादीही आहे
19:37
which is probably me --
318
1152000
1000
- म्हणजे बहुतेक मीच --
19:38
what we say is, "Vile monster, prison is too good for you."
319
1153000
4000
तर आम्ही म्हणतो ते असं : "अधम राक्षसा, तुझ्यासारख्याला तुरुंगात घालणं म्हणजे तर तुझ्यावर दयाच दाखवल्यासारखं आहे."
19:42
Or worse, we seek revenge, in all probability thereby triggering
320
1157000
4000
किंवा त्याहूनही वाईट म्हणजे आपण सूड घेऊ पाहतो, आणि त्यातून प्रति-सूडाच्या
19:46
the next phase in an escalating cycle of counter-revenge,
321
1161000
3000
एका वाढत्या चक्राला सुरुवात होण्याची दाट शक्यता असते.
19:49
which we see, of course, all over the world today.
322
1164000
2000
हे असं सूडचक्र तर आपण अर्थातच आज जगात सगळीकडे बघतो आहोत.
19:52
In short, when we're thinking like academics,
323
1167000
2000
थोडक्यात, जेव्हा आपण तर्काधिष्ठित विचार करत असतो,
19:55
we regard people as elaborate and complicated machines,
324
1170000
3000
तेव्हा आपण लोकांकडे ती संगणकासारखी किंवा मोटार कारसारखी खूप विस्तृत आणि गुंतागुंतीची
19:58
like computers or cars, but when we revert to being human
325
1173000
4000
यंत्रं आहेत अशा रीतीनं बघतो, पण जेव्हा आपण परत माणसासारखा विचार करायला लागतो
20:03
we behave more like Basil Fawlty, who, we remember,
326
1178000
3000
तेव्हा आपण जरा बॅसिल फोल्टीसारखं वागायला लागतो. आपल्याला आठवत असेल,
20:06
thrashed his car to teach it a lesson when it wouldn't start
327
1181000
3000
की (बीबीसीच्या ’फोल्टी टॉवर्स’ या मालिकेतला) फोल्टी एकदा एका खास मेजवानीच्या रात्री त्याची गाडी
20:09
on gourmet night. (Laughter)
328
1184000
3000
सुरू होत नाही म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी चांगलं चोपून काढतो. (हशा)
20:13
The reason we personify things like cars and computers
329
1188000
3000
आपण गाड्या आणि संगणक यांच्यासारख्या गोष्टींना मनुष्यरूप देऊ पाहतो याचं कारण म्हणजे
20:16
is that just as monkeys live in an arboreal world
330
1191000
3000
माकडं जशी झाडांच्या जगात राहतात,
20:19
and moles live in an underground world
331
1194000
3000
घुशी जशा जमिनीखालच्या जगात राहतात
20:22
and water striders live in a surface tension-dominated flatland,
332
1197000
3000
आणि पाणकिडे जसे पृष्ठताणाचं अधिराज्य असलेल्या सपाट जगात राहतात
20:26
we live in a social world. We swim through a sea of people --
333
1201000
4000
तसे आपण एका सामाजिक जगात राहतो. आपण माणसांच्या समुद्रातून पोहत जात असतो --
20:30
a social version of Middle World.
334
1205000
2000
हे मधल्या जगाचं सामाजिक रूप आहे.
20:34
We are evolved to second-guess the behavior of others
335
1209000
2000
आपण इतरांच्या वर्तणुकीचा अंदाज बांधणारे अतिशय तल्लख,
20:37
by becoming brilliant, intuitive psychologists.
336
1212000
3000
अंत:प्रेरित मानसशास्त्रज्ञ बनून उत्क्रांत झालो आहोत.
20:41
Treating people as machines
337
1216000
2000
माणसांना यंत्राप्रमाणे वागवणं हे
20:43
may be scientifically and philosophically accurate,
338
1218000
3000
वैज्ञानिकदृष्ट्या आणि तात्त्विकरित्या अचूक असेल,
20:47
but it's a cumbersome waste of time
339
1222000
1000
पण जर तुम्हांला तो माणूस याच्यानंतर काय करणार आहे हे ओळखायचं असेल
20:48
if you want to guess what this person is going to do next.
340
1223000
3000
तर तसं करणं ही वेळेची फुकटंफाकट नासाडी ठरेल.
20:52
The economically useful way to model a person
341
1227000
2000
एखाद्या व्यक्तीचा आराखडा बनवायचा सर्वात कमी खर्चिक मार्ग म्हणजे
20:55
is to treat him as a purposeful, goal-seeking agent
342
1230000
3000
त्या व्यक्तीला एक सहेतुक, काहीतरी मिळवायच्या उद्देशानं काम करणारी, आनंद आणि दुःख , इच्छा-आकांक्षा
20:58
with pleasures and pains, desires and intentions,
343
1233000
2000
आणि उद्दिष्टं असणारी, अपराधीपणाची भावना बाळगणारी, ठपका ठेवण्यालायक असलेली
21:01
guilt, blame-worthiness.
344
1236000
1000
व्यक्ती असल्यासारखं वागवणं.
21:03
Personification and the imputing of intentional purpose
345
1238000
4000
मानवीकरण आणि सहेतुक उद्दिष्टाचं आरोपण हा
21:08
is such a brilliantly successful way to model humans,
346
1243000
2000
माणसांचा आराखडा बनवायचा इतका पराकोटीचा यशस्वी मार्ग आहे,
21:11
it's hardly surprising the same modeling software
347
1246000
3000
की तसा आराखडा बनवणाऱ्या सॉफ्टवेअरने ते ज्या गोष्टींकरता योग्य नाही
21:14
often seizes control when we're trying to think about entities
348
1249000
4000
त्या गोष्टींबद्दल आपण विचार करत असतानाही त्यांच्यावर हुकूमत गाजवणं
21:18
for which it's not appropriate, like Basil Fawlty with his car
349
1253000
3000
बॅसिल फ़ोल्टी आणि त्याची गाडी.
21:21
or like millions of deluded people with the universe as a whole. (Laughter)
350
1256000
8000
किंवा अख्ख्या जगातले लाखो भाबडे, फसवले गेलेले लोक. (हशा)
21:29
If the universe is queerer than we can suppose,
351
1264000
2000
जर हे विश्व आपल्याला वाटू शकतं त्याहूनही विचित्र असेल
21:32
is it just because we've been naturally selected to suppose
352
1267000
3000
तर ते केवळ एवढ्याचसाठी का, की आपण प्लायस्टोसीन युगात आफ्रिकेत असताना
21:35
only what we needed to suppose in order to survive
353
1270000
3000
तिथे टिकून राहण्यासाठी ज्या गोष्टींची कल्पना करण्याची आपल्याला गरज होती,
21:38
in the Pleistocene of Africa?
354
1273000
2000
केवळ त्याच गोष्टी कल्पिण्याकरता आपली नैसर्गिक निवड झाली आहे?
21:41
Or are our brains so versatile and expandable that we can
355
1276000
4000
की आपले मेंदू इतके अष्टपैलू आणि विस्तार करण्याजोगे आहेत
21:45
train ourselves to break out of the box of our evolution?
356
1280000
4000
की आपण आपल्याच उत्क्रांतीच्या खोक्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या मेंदूला प्रशिक्षण देऊ शकतो?
21:50
Or, finally, are there some things in the universe so queer
357
1285000
4000
किंवा, सरतेशेवटी, विश्वात इतक्या विचित्र अशा काही गोष्टी आहेत का
21:54
that no philosophy of beings, however godlike, could dream them?
358
1289000
6000
की कुठल्याही जीवमात्रांचं (भले ते कितीही देवासारखे असूदेत) कोणतंही तत्त्वज्ञान, त्या गोष्टींची कल्पनाच करू शकणार नाही?
22:01
Thank you very much.
359
1296000
1000
धन्यवाद.
Translated by Gayatri Natu
Reviewed by Pratik Dixit

▲Back to top

ABOUT THE SPEAKER
Richard Dawkins - Evolutionary biologist
Oxford professor Richard Dawkins has helped steer evolutionary science into the 21st century, and his concept of the "meme" contextualized the spread of ideas in the information age. In recent years, his devastating critique of religion has made him a leading figure in the New Atheism.

Why you should listen

As an evolutionary biologist, Richard Dawkins has broadened our understanding of the genetic origin of our species; as a popular author, he has helped lay readers understand complex scientific concepts. He's best-known for the ideas laid out in his landmark book The Selfish Gene and fleshed out in The Extended Phenotype: the rather radical notion that Darwinian selection happens not at the level of the individual, but at the level of our DNA. The implication: We evolved for only one purpose — to serve our genes.

Of perhaps equal importance is Dawkins' concept of the meme, which he defines as a self-replicating unit of culture -- an idea, a chain letter, a catchy tune, an urban legend -- which is passed person-to-person, its longevity based on its ability to lodge in the brain and inspire transmission to others. Introduced in The Selfish Gene in 1976, the concept of memes has itself proven highly contagious, inspiring countless accounts and explanations of idea propagation in the information age.

In recent years, Dawkins has become outspoken in his atheism, coining the word "bright" (as an alternate to atheist), and encouraging fellow non-believers to stand up and be identified. His controversial, confrontational 2002 TED talk was a seminal moment for the New Atheism, as was the publication of his 2006 book, The God Delusion, a bestselling critique of religion that championed atheism and promoted scientific principles over creationism and intelligent design.

More profile about the speaker
Richard Dawkins | Speaker | TED.com