TED Talks with Marathi transcript

दीपा नारायण: मुलींचा आवाज दाबणाऱ्या सात सवयी नष्ट कशा कराव्यात.

TED Talks India: Nayi Baat

दीपा नारायण: मुलींचा आवाज दाबणाऱ्या सात सवयी नष्ट कशा कराव्यात.
270,639 views
No Video

समाजशास्त्रज्ञ दीपा नारायण म्हणतात, भारतात आणि इतर अनेक देशांत आजही नम्रतेच्या आणि मर्यादांच्या पारंपरिक नियमांखाली मुली आणि स्त्रियांचा आवाज दाबून टाकला जातो. या सडेतोड व्याख्यानात त्यांनी समाजात खोलवर रुजलेल्या, असमानता वाढवणाऱ्या सात सवयी सांगितल्या आहेत, आणि बदल घडवून आणण्यात पुरुषांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आहे.

जोहान हारी: नैराश्य आणि चिंताविकाराची ही कारणं असू शकतील

TEDSummit 2019

जोहान हारी: नैराश्य आणि चिंताविकाराची ही कारणं असू शकतील
5,432,613 views

नैराश्य आणि चिंताविकाराच्या कारणांबद्दलचे जगभरातल्या तज्ज्ञांचे नवे विचार सांगणारं, कृतिशील करणारं पत्रकार जोहान हारी यांचं एक मार्मिक व्याख्यान. यात ते काही नवे उपायही सुचवतात. हारी म्हणतात, "नैराश्य किंवा चिंताविकार म्हणजे दुबळेपणा नव्हे किंवा वेडही नव्हे. फक्त तुमच्या काही मानवी गरजा पूर्ण झालेल्या नाहीत, इतकंच."

एलिझाबेथ हॉवेल: आपण मातांसाठीच्या आरोग्यसेवेत काय सुधारणा करू शकतो?-गर्भधारणेपूर्वी,गर्भावस्थेत व नंतर

TEDMED 2018

एलिझाबेथ हॉवेल: आपण मातांसाठीच्या आरोग्यसेवेत काय सुधारणा करू शकतो?-गर्भधारणेपूर्वी,गर्भावस्थेत व नंतर
1,629,987 views

धक्कादायक पण सत्य: युनायटेड स्टेटस् मधील नवमातांच्या मृत्यूचा दर इतर विकसित देशांपेक्षा खूप जास्त आहे आणि त्यापैकी 60टक्के टाळता येण्याजोगे आहेत. चिकित्सक एलिझाबेथ हॉवेल स्पष्टता व निकडीने मातामृत्यूची कारणे विशद करतात आणि रूग्णालये व डॉक्टरांना स्त्रियांचा गर्भधारणा,गर्भावस्था व प्रसुतीनंतरचा काळ सुरक्षित करण्याचे मार्ग सांगतात.

नाटली फ्रँट्टो: तुमची अनुकूलता पडताळण्याचे ३ मार्ग- आणि ती कशी वाढवावी

TED Residency

नाटली फ्रँट्टो: तुमची अनुकूलता पडताळण्याचे ३ मार्ग- आणि ती कशी वाढवावी
2,858,888 views

जेव्हा उपक्रम गुंतवणूकदार नाटली फ्रँट्टो ठरवते, कोणत्या लघुउद्योग संस्थापकाला पाठिंबा द्यावा तेव्हा ती फक्त बुद्धी किंवा तेज शोधत नाही; ती शोधते अनुकूलता. या अंतर्दृष्टी देणाऱ्या भाषणात, फ्रँट्टो "अनुकूलनांक" मोजण्याचे तीन मार्ग सांगते- आणि बदलाला प्रतिसाद देण्याची क्षमता का महत्त्वाची आहे हे दाखवते.

रायन मार्टिन: आपण का संतापतो -- आणि ते आरोग्यदायी का आहे

TEDxFondduLac

रायन मार्टिन: आपण का संतापतो -- आणि ते आरोग्यदायी का आहे
2,589,046 views

क्रोध संशोधक रायन मार्टिन यांनी माणसाला येणारा राग आणि त्यावेळी मेंदूत घडणाऱ्या क्रिया यांचा सखोल अभ्यास केला आहे व रागाची आरोग्यदायी मात्रा कशी उपयुक्त ठरू शकते यावर संशोधन केले आहे. ते म्हणतात , "तुमचा राग तुमच्यात भावनेच्या रूपात अस्तित्वात आहे कारण त्याने तुमच्या दोन्ही- मानवी व अमानवी पूर्वजांना उत्क्रांतीरूपी लाभ करून दिला आहे. ती तुमच्या जीवनातील प्रबळ व आरोग्यदायी शक्ती आहे."

कार्सन ब्रून्स: गोंदण तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकते का?

TEDxMileHigh

कार्सन ब्रून्स: गोंदण तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकते का?
624,671 views

आपण गोंदणाला सुंदर तसेच कार्यक्षम बनवू शकतो का? सूक्ष्मतंत्रज्ञ कार्सन ब्रून्स सांगत आहेत त्यांच्या उच्च तंत्रज्ञान युक्त गोंदणाच्या निर्मितीबद्दल जे त्याच्या पर्यावरणाला प्रतिक्रिया देते. जसे रंग बदलणारी शाई सांगते तुम्हाला कधी सनबर्न होत आहे. शिवाय रोमांचक रीतीने ते तुमच्या वर्तमान आरोग्याविषयी माहिती देते

सुचित्रा कृष्णन-सरीन: इ-सिगारेट्सच्या धूम्रपानाचे  धोके जाणून घ्या.

TEDMED 2018

सुचित्रा कृष्णन-सरीन: इ-सिगारेट्सच्या धूम्रपानाचे धोके जाणून घ्या.
2,353,117 views

गेल्या दशकात व्हेप्स आणि इ-सिगारेट्सची लोकप्रियता शिगेला पोहोचली. २०११ ते २०१५ या काळात तरुणाईचा, खासकरून माध्यमिक शाळांतल्या विद्यार्थ्यांमधला इ-सिगारेट्सचा वापर ९०० टक्क्यांनी वाढला. व्हेपिंग करताना श्वासाबरोबर नेमकं काय शोषलं जातं, ते समजावून सांगताहेत जैविक स्वभावशास्त्रज्ञ सुचित्रा कृष्णन-सरीन. (सूचना: पाण्याची वाफ नक्कीच नव्हे.) इ-सिगारेट्स विकण्याकरता किती भयानक पद्धतीने मुलांना लक्ष्य बनवलं जातं, यावरदेखील त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्या म्हणतात, "आपलं, आपल्या मुलांचं, आणि आपल्या पुढल्या पिढ्यांचं आरोग्य फार मौल्यवान आहे. ते आपण धुरामधून किंवा एरोसोलमधून उडून जाऊ देता कामा नये."

ग्रेटा थुनबर्ग: हवामान बदलासाठी तात्काळ कृती करा: निरुत्तर करणारं आवाहन.

TEDxStockholm

ग्रेटा थुनबर्ग: हवामान बदलासाठी तात्काळ कृती करा: निरुत्तर करणारं आवाहन.
4,925,488 views

२०१८ सालच्या ऑगस्ट महिन्यात ग्रेटा थनबर्ग ही १६ वर्षांची हवामानविषयक कार्यकर्ती शाळेतून बाहेर पडली, आणि तिने जागतिक तापमानवाढीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संप पुकारला. स्वीडनच्या पार्लमेंटच्या बाहेर निषेध व्यक्त करून तिने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. यामागचं कारण तिने दिलेल्या या भावपूर्ण व्याख्यानात ऐका. ग्रेटा म्हणते, "हवामानाची समस्या कधीच सोडवून झाली आहे. सर्व माहिती आणि उपाय आपल्याजवळ आहेत. फक्त आपण जागं व्हायला हवं, आणि बदलायला हवं."

मॅट मुलेंवेग: घरातून काम करणे व्यवसायासाठी का चांगले आहे?

The Way We Work

मॅट मुलेंवेग: घरातून काम करणे व्यवसायासाठी का चांगले आहे?
1,695,457 views

दूरस्थ कामाची लोकप्रियता वाढत चालली आहे त्यामुळे आजचे कर्मचारी कर्मचारी वेगवेगळ्या वेळांमध्ये एकमेकांच्या सहयोगाने काम करू शकतात. यामुळे कार्यालयाशी संबंधित गणिते कशी बदलतात ? आणि आपण हे कसे सुनिश्चित करू शकतो की मुख्यालयात आणि घरात दोन्ही ठिकाणहून काम करणारे कर्मचारी एकमेकांच्या कायम संपर्कात राहतील ? मॅट मुलेंवेग,वर्डप्रेस सह संस्थापक आणि ऑटोमॅटिकचे सीईओ(ज्यामध्ये 100 टक्के वितरित कार्यबल आहे), आपल्याला सांगताहेत या संबंधीची रहस्ये !

लिडिया माचोवा: नवीन भाषा लवकर शिकण्यासाठीची रहस्य !

TED Salon Brightline Initiative

लिडिया माचोवा: नवीन भाषा लवकर शिकण्यासाठीची रहस्य !
7,231,347 views

एखादी नवीन भाषा शिकायची इच्छा आहे पण कशी आणि कुठून सुरुवात करावी याबद्दल धास्ती वाटतेय? यासाठी तुम्हाला नक्कीच कोणत्या खास प्रतिभा किंवा अनुवांशिकतेने आलेल्या गुणांची वगैरे गरज नाही याची खात्री देतायत 'लिडिया माचोवा'. आपल्या प्रेरणादायी आणि उत्साही शैलीत त्या 'बहुभाषिकांची' काही रहस्य उलगडून सांगतायत आणि त्याच बरोबर तुमच्यातील भाषिक प्रतिभा जागृत करण्यासाठी उपयुक्त अशी चार तत्व सुद्धा समजावून सांगत आहेत.

कैतलीन  साद्त्लेर: आपल्या शरीराला जखमा लवकर भरून काढायला कसं शिकवता येईल

TED2018

कैतलीन साद्त्लेर: आपल्या शरीराला जखमा लवकर भरून काढायला कसं शिकवता येईल
2,315,538 views

शरीर डाग मागे न ठेवता जखमा कश्या लवकर भरून काढेल याबाबत कैतलीन साद्त्लेर माहिती देत आहेत त्या जैविक साधने बनवीत आहेत ज्या योगे जखमा डाग न ठेवता लवकर बऱ्या होतील गमावलेला अवयव जसा पाल व सरडा पुन्हा प्राप्त करतो तसे मानवात होऊ शकेल असा विश्वास आहे.

चेतना गाला सिन्हा: ग्रामीण भारतीय महिलांनी कशाप्रकारे आपल्या धैर्याचं भांडवलात रुपांतर केलं!

TED2018

चेतना गाला सिन्हा: ग्रामीण भारतीय महिलांनी कशाप्रकारे आपल्या धैर्याचं भांडवलात रुपांतर केलं!
1,542,110 views

खेड्यात राहणाऱ्या आपल्या शेजारच्या महिलांना बँकांनी कर्ज नाकारलं, तेव्हा चेतना गाला सिन्हा यांनी एक मोठं कार्य केलं: त्यांनी स्वतःचीच बँक सुरु केली. महिलांनी महिलांसाठी सुरु केलेली देशातली पहिलीच बँक! या प्रेरणादायी भाषणातून चेतना सिन्हा काही महिलांच्या गोष्टी सादर करतात, ज्या महिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि ज्यांनी कोणतेही परंपरागत आर्थिक पाठबळ नसलेल्या महिलांच्या समस्यांवर उपाय शोधण्याला सिन्हा यांच्याकडे सतत आग्रह धरला.

सुपासोन सुवाजनकोन: खऱ्या लोकांचे खोटे व्हिडीओ - आणि ते कसे ओळखावेत?

TED2018

सुपासोन सुवाजनकोन: खऱ्या लोकांचे खोटे व्हिडीओ - आणि ते कसे ओळखावेत?
1,453,308 views

तुम्ही एखाद्या व्हिडिओ चा खरे-खोटेपणा ओळखू शकता? असे व्हिडिओ, ज्यात बरेचदा प्रसिद्ध व्यक्तींच्या तोंडून त्यांनी वास्तविक जीवनात कधीही न मांडलेली मतं वदवून घेतली जातात. हे व्हिडिओ कसे तयार केले जातात हे या रोचक चर्चेत आणि त्यातील तांत्रिक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जाणून घ्या. संगणक शास्त्रज्ञ 'सुपासोन सुवाजनकोन' सांगत आहेत एक स्नातक विद्यार्थी म्हणून, त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि 3 डी मॉडेलिंगचा वापर करत वास्तवाशी मिळतेजुळते बनावट व्हिडिओ बनवण्याचे तंत्र कसे विकसित केले या संबंधी. जाणून घ्या या तंत्राचे संभाव्य उपयोग, नैतिक परिणाम तसेच याचा गैरवापर टाळण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी.

मिखाईल जिगार: सोशल मीडियावर रशियन राज्यक्रांती कशी दिसली असती?

TED2018

मिखाईल जिगार: सोशल मीडियावर रशियन राज्यक्रांती कशी दिसली असती?
1,432,185 views

इतिहास हा नेहमी जेत्यांकडून लिहिला जातो असं म्हणतात; पण जर तो सगळ्यांनाच लिहिता/मांडता आला, तर तो कसा असेल? स्वतः पत्रकार असलेले आणि टेड शी जोडले गेलेले 'मिखाईल जिगार' आपल्याला हेच दाखवण्याच्या प्रयत्न करतायत, त्यांच्या 'Project1917' या प्रकल्पाच्या माध्यमातून. 'मृत व्यक्तींसाठी असलेलं हे एक सोशल नेटवर्क' आहे. रशियन राज्यक्रांतीच्या काळातील ३००० हुन अधिक लोकांनी लिहिलेल्या डायऱ्या, पत्र इत्यादी यावर पोस्ट केलं जातं. लेनिन, ट्रॉटस्की आणि इतर अनेक न नावाजलेल्या व्यक्तींचे रोजचे विचार मांडत, इतिहास कसा होता आणि कसा असला असता यावर हा प्रकल्प प्रकाश टाकतो. भूतकाळावर डिजिटल मध्यमा द्वारे नव्याने भाष्य करणाऱ्या या प्रकल्पा विषयी आणि जिगार यांच्या १९६८ या परिवर्तनकारी वर्षाशी निगडित नवीन प्रकल्पा विषयी जाणून घ्या या व्हिडिओ मधून.

सिमोन गिर्ट्झ: कुचकामी यंत्रं बनवा.

TED2018

सिमोन गिर्ट्झ: कुचकामी यंत्रं बनवा.
3,465,638 views

सिमोन गिर्ट्झ यांचं एक हसतंखेळतं मजेशीर हृद्य भाषण. यात आहेत त्यांनी स्वतः बनवलेल्या चित्रविचित्र अद्भुत वस्तूंची प्रात्यक्षिकं. निरुपयोगी यंत्रं बनवण्याच्या आपल्या कलेची ओळख त्यांनी इथे करून दिली आहे. भाजी चिरणे, केस कापणे, लिपस्टिक लावणे, आणि अशीच इतर अनेक कामं करण्यासाठी त्यांनी बनवलेली यंत्रं कुचकामी ठरली आहेत. आणि हाच मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटतो. त्या म्हणतात, "आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठाऊक नाहीत हे कबूल करणं, हीच तर निरुपयोगी गोष्टी बनवण्यामागची खरी मजा आहे. त्यामुळे काय होतं, तर आपल्याला जगातलं सगळं ठाऊक आहे, असं सांगणारा तो आपल्याच डोक्यातला आवाज गप्प बसतो. टूथब्रश हेल्मेट हे उत्तर नसेल, पण आपण निदान प्रश्न तरी विचारला, हे महत्त्वाचं."

निलय कुलकर्णी: चेंगराचेंगरी थांबवून जीव वाचवणारं नवीन संशोधन

TEDNYC

निलय कुलकर्णी: चेंगराचेंगरी थांबवून जीव वाचवणारं नवीन संशोधन
1,058,806 views

दर तीन वर्षांनी सुमारे ३० दशलक्ष हिंदू भाविक कुंभमेळ्यात आपली पापं धुवून टाकण्यासाठी जमतात. हा जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. छोट्या गावांत आणि शहरांत उतरणाऱ्या या प्रचंड मोठ्या जमावामुळे चेंगराचेंगरी होणं अटळ असतं. २००३ साली या मेळाव्यात ३९ माणसं दगावली. २०१४ मध्ये, १५ वर्षांच्या निलय कुलकर्णीने आपलं स्वतःच शिकलेलं प्रोग्रॅमिंगचं कौशल्य वापरून, चेंगराचेंगरी थांबवण्यासाठी एक उपाय शोधायचं ठरवलं. त्याच्या संशोधनाबद्दल जास्त माहिती या भाषणात ऐका. आणि २०१५ चा कुंभमेळा चेंगराचेंगरीशिवाय, मनुष्यहानीशिवाय पार पाडण्यात या संशोधनाची कशी मदत झाली, ते पहा.

वेन्डी सुझुकी: व्यायामाचा मेंदूवर होणारा परिणाम

TEDWomen 2017

वेन्डी सुझुकी: व्यायामाचा मेंदूवर होणारा परिणाम
8,225,245 views

व्यायाम ही अशी बाब आहे की जी तुमच्या मेंदूचे रक्षण करते .तुमची मनोवस्था सुदृढ ठेवते. अल्झायमरला दूर ठेवते .व्यायामाने मेंदूतील हिप्पोकाम्पास व कार्टेक्स यातील न्युरो ट्रान्स मीटर वाढतात .स्मृती काळ टिकते .वयाबरोबर या भागातील चेता पेशींचा ऱ्हास होतो पण व्यायाम केल्यास अल्झायमर खूप काळ दूर राहतो

सूझन डेव्हिड: भावनिक धैर्य: एक ताकद, तशीच देणगीही.

TEDWomen 2017

सूझन डेव्हिड: भावनिक धैर्य: एक ताकद, तशीच देणगीही.
6,509,711 views

मानसशास्त्रज्ञ सूझन डेव्हिड म्हणतात, आपण आपल्या भावना कशा हाताळतो त्यावर आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून असतात: आपली कृती, व्यवसाय, नातेसंबंध, आरोग्य आणि आनंद. या नर्मविनोदी, मन हेलावणाऱ्या, कदाचित आयुष्य बदलून टाकायची ताकद असणाऱ्या भाषणात त्यांनी आव्हान दिलं आहे, ते भावनिक वस्तुस्थितीपेक्षा सकारात्मकतेला जास्त महत्त्व देणाऱ्या आजच्या संस्कृतीला. भावनिक चापल्य अमलात आणण्याचे ठोस उपाय त्यांनी इथे सांगितले आहेत. सर्वांनी पाहण्याजोगं एक भाषण.

मिशेल नोक्स: निरोगी असतानाच  मृत्यू बद्दल बोला  .

TED@Westpac

मिशेल नोक्स: निरोगी असतानाच मृत्यू बद्दल बोला .
1,338,468 views

मृत्यू समयी तुमची इच्छा काय आहे ?तुमची आठवण कशी राहावी इतरांना ? या विषयावर आपण बोलत नाही . पण नोक्स म्हणतात "आपण आपल्या मृत्यू बाबत स्वतः निरोगी असतानाच बोलले पाहिजे तरच आपण भावनिकदृष्ट्या दृष्ट्या इतरांना ही आपला मृत्यू सुसह्य करू .

गौतम भान: दहा कोटी लोकांना घर मिळवून देण्याची एक महत्वाकांक्षी योजना

TED Talks India

गौतम भान: दहा कोटी लोकांना घर मिळवून देण्याची एक महत्वाकांक्षी योजना
529,047 views
No Video

मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, पूर्ण भारतातल्या सर्व प्रमुख शहरांमधील एक समान बाब आहे - कामाच्या शोधात आलेल्या लोकांचे ते स्वागत करतात. पण या स्वागत आणि मोकळेपणा च्या दुसर्या बाजूला काय आहे ? दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि जवळजवळ १० कोटी लोकांसाठी घराची कमतरता आहे, ज्यातले बरेच जन बेकायदेशीर वस्त्यांमधून राहतात. डॉ गौतम भान एक मानवी वस्ती तज्ञ, संशोधक निर्भयपणे या समस्येवर उत्तर शोधात आहेत. ते शहरी भारतासाठी नवीन दृष्टिकोनाचा विचार करतात, जिथे प्रत्येक व्यक्ती कडे एक सुरक्षित आणि राहण्यायोग्य घर असेल.

डैन गरटेनबर्ग: झोपेचे मेंदूला मिळणारे फायदे

TED Residency

डैन गरटेनबर्ग: झोपेचे मेंदूला मिळणारे फायदे
3,783,689 views

गाढ झोपेत मेंदूत डेल्टा लहरी निर्माण होतात. ज्यामुळे पेशींची दुरुस्ती व निर्मिती होते, स्मरणशक्तीचा विकास होतो. अपुरी झोप अल्झायमर मधुमेह यांना आमंत्रण देते. या गाढ झोपेसाठी तंत्रज्ञान शोधीत आहे डैन गटेनबर्ग व त्यांचे जर्मन सहकारी. एक दिवस उजाडेल जेव्हा आपण त्या उप्कात्नाचा वापर करून रोज गाढ झोप घेऊ व आपले आरोग्य राखू

अमीना गुरीब-फकीम: मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षांची मुलाखत.

TEDGlobal 2017

अमीना गुरीब-फकीम: मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षांची मुलाखत.
955,773 views

अमीना गुरीब-फकीम या एक शिक्षणाधिकारी आणि उद्योजिका होत्या. आता त्या मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षा आहेत. आफ्रिकेतल्या पहिल्या मुस्लिम स्त्री राष्ट्राध्यक्षा. पत्रकार स्टेफनी बुसारी यांनी त्यांच्याशी विस्तृत संवाद साधला. त्यात गुरीब-फकीम सांगताहेत, आपल्या राजकीय कारकिर्दीची साधीसोपी सुरुवात कशी झाली, एकाच वेळी धार्मिक आणि वैज्ञानिक विचार असणं म्हणजे काय, पारंपारिक आफ्रिकन ज्ञान जतन का करायला हवं, आणि इतर अनेक गोष्टींबद्दल. त्या म्हणतात, "स्वतःला फार महत्त्व देऊ नका. आपल्या कामावर श्रद्धा ठेवा. आत्मविश्वास बाळगा. आपली ध्येयं निश्चित करा आणि त्यांच्या दिशेने काम करा."

बेथ  मालोन: वडिलांच्या  डीमेंशिया ने  माझी मृत्यूची संकल्पना बदलली

TED Residency

बेथ मालोन: वडिलांच्या डीमेंशिया ने माझी मृत्यूची संकल्पना बदलली
1,258,144 views

बेथ मालोन आपल्या वडिलांना भोगाव्या लागणाऱ्या डीमेंशियाच्या आज्राचा अनुभव कथन करीत आहेत एका मुलीची जीवन मृत्यूची कल्पना कशी बदलली याची हृद्य स्पर्शी कथा.

गिउला एंडर: आतड्याचे मोहक विज्ञान

TEDxDanubia

गिउला एंडर: आतड्याचे मोहक विज्ञान
4,411,130 views

आपण शौच कशी करतो?आतड्याच्या आत कशी कामे चालतात ते शिका ते अतिशय जटील पण मोहक विज्ञान आहे.त्याचा सबंध मानसिक आरोग्याशी आहे आपण न लाजता या विज्ञानाची माहिती घेतली पाहिजे.जन मेंदू व आतड्याची संदेश प्रणाली ,स्वच्छतेचा नवा दृष्टीकोन

पॉल टेसनर: ६६व्या वर्षी मी उद्योजक कसा झालो

TED Residency

पॉल टेसनर: ६६व्या वर्षी मी उद्योजक कसा झालो
2,185,984 views

तुम्ही स्वतःला गवसण्यास मुळीच उशीर झालेला नाही. पॉल टेसनर यांना बघा -- इतरांसाठी सतत ४० वर्षे काम केल्यावर, त्यांनी वयाच्या ६६व्या वर्षी स्वतःचा स्टार्ट-अप सुरु केला, व्यवसायासाठी आपल्या कल्पनेला त्यांनी त्यांच्या अनुभवाची व हौसेची जोड दिली. ते काही एकाकी नव्हते. आपल्या त्रोटक, मनोरंजक आणि प्रोत्साहनपर व्याख्यानात ते सांगतात, ज्येष्ठ अनुभवी मंडळी ही जास्तीतजास्त त्यांच्या उद्यमी अंतःप्रेरणेत गुंतून राहतात -- आणि म्हणून यशाच्या शिखरावर पोहचतात.

यूना ली: उत्तर कोरियामध्ये मी कैदी म्हणून काय शिकले?

TEDxIndianaUniversity

यूना ली: उत्तर कोरियामध्ये मी कैदी म्हणून काय शिकले?
3,295,725 views

मार्च २००९ मध्ये, पत्रकार यूना ली आणि तिची सहकारी लॉरा किंग या दोघी चीनच्या सीमेवर एका लघुपटाचं चित्रीकरण करत असतांना उत्तर कोरियाच्या सैनिकांनी त्यांना कैद केलं. न्यायालयाने त्यांना १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, परंतु अमेरिकन मुत्सद्दींनी अखेरीस वाटाघाटी करून त्यांची सुटका घडवून आणली. शत्रूपक्षी म्हणून तब्बल १४० दिवस प्रतिबंधात्मक बंदिवासात राहण्याचा अनुभव आणि पहारेकऱ्यांनी किंचित माणुसकी, दयाभाव दाखवल्याने ती कसा टिकाव धरू शकली या सर्व गोष्टी यूना ली या अपूर्व आणि मानवतापूर्ण व्याख्यानात कथन करते.

डेव्हिड ली: भविष्यातील नोकरी करणं हे काम करण्यासारखं का वाटणार नाही

TED@UPS

डेव्हिड ली: भविष्यातील नोकरी करणं हे काम करण्यासारखं का वाटणार नाही
1,916,479 views

आपण सर्व हे ऐकून आहोत की रोबोट्स आपला रोजगार हिसकावून घेणार आहेत -- पण त्यात आपल्याकडून काय करणं शक्य आहे? अभिनव कल्पनातज्ज्ञ डेव्हिड ली म्हणतात की आपण अशा रोजगाराची आखणी करायला हवी जे आपल्याला रोबोटिक्सच्या युगात सुसंगत ठेवण्यासाठी आपली सुप्त कौशल्ये आणि छंद यांना प्रकट करतील, जसे, ज्या गोष्टी करून आपण आपले वीकेंड्स व्यतीत करतो. "लोकांना विचारायला सुरवात करा की कोणत्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळतेय आणि कोणत्या कौशल्यांचा त्यांना कामात अवलंब करायचाय," ली म्हणतात. "जेव्हा तुम्ही लोकांना आणखी मोठं होण्यासाठी अवसर देता, तेव्हा ते आणखी मोठे कसे होऊ शकतात हे दाखवून आपल्याला थक्क करतात."

निकी वेबर एलन: शांततेत तुमचं नैराश्य सहन करू नका

TED Residency

निकी वेबर एलन: शांततेत तुमचं नैराश्य सहन करू नका
2,292,266 views

भावनाशील असणं हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही -- त्यांचा अर्थ होतो की आपण माणूस आहोत, इति निर्माती आणि कार्यकर्ती, निकी वेबर एलन. अस्वस्थता आणि नैराश्याचं निदान झालेलं असतांनाही, वेबर एलनला हे सांगण्यास संकोच वाटला. आपल्या जवळच्या व्यक्तीने नैराश्यग्रस्ततेतून मृत्यू कवटाळेपर्यंत वेबरने आपली मनस्थिती गुप्त ठेवली. मानसिक स्वास्थ्याविषयीच्या या महत्वपूर्ण व्याख्यानात, ती आपल्या संघर्षाबद्दल मोकळेपणाने बोलते --

क्रिश्चन रॉड्रिग्ज: लॅटिन अमेरिकेतील किशोरवयीन गरोदरपणाची बिकट परिस्थिती

TEDGlobal 2017

क्रिश्चन रॉड्रिग्ज: लॅटिन अमेरिकेतील किशोरवयीन गरोदरपणाची बिकट परिस्थिती
1,222,731 views
No Video

क्रिश्चन रॉड्रिग्ज एक छायाचित्रकार आणि चित्रपटनिर्माते -- तसेच किशोरवयीन मातेचे अपत्य आहेत. गेल्या ५ वर्षांत, त्यांनी लॅटिन अमेरिकेतील किशोरवयीन गरोदरपणाचं, १२ वर्षे वयाच्या कोवळ्या मातांचं गहन आणि उदात्त चित्रण केलेलं आहे. या हृदयद्रावक, दृश्यात्मक संभाषणात; ते त्यांचं कार्य व्यक्त करतात आणि ऐन कौमार्यातील मातृत्व मुलींना कशाप्रकारे गरिबी आणि पिळवणुकीच्या दुष्टचक्रात अडकवतं ते उलगडून सांगतात.

एमिली एसफहानी स्मिथ: आनंदी असण्याहून अधिक आयुष्यात बरंच काही आहे

TED2017

एमिली एसफहानी स्मिथ: आनंदी असण्याहून अधिक आयुष्यात बरंच काही आहे
8,815,535 views

आपल्या संकृतीला आनंदाने पछाडलेलं आहे, पण अधिक समाधान देणारा दुसरा मार्ग असला तर? लेखिका एमिली एसफहानी स्मिथ म्हणतात कि आनंद येतो आणि जातो, पण अर्थपूर्ण आयुष्य -- स्वत्वाच्या पलीकडील कशाचीतरी सेवा करणे आणि स्वतःतील उत्तमाला घडवणे -- काहीतरी तग धरून राहण्यासाठी देतं. एसफहानी स्मिथ अर्थपूर्ण आयुष्याच्या चार स्तंभांबद्दल सांगत असताना आनंदी असणे आणि अर्थ असणे यांतील फरक जाणून घ्या.