टिम फेरिस: ध्येयनिश्चिती नको, भीती-निश्चिती करा.

TED2017

टिम फेरिस: ध्येयनिश्चिती नको, भीती-निश्चिती करा.


कठीण पर्याय, म्हणजेच जे करण्याची, विचारण्याची, बोलण्याची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते, नेमकं तेच आपण करण्याची गरज असते. हतबलतेवर मात करून कृती कशी करावी? टिम फेरिस सांगतात, भीतीकडे नीट पूर्णपणे पहा आणि सविस्तरपणे लिहून काढा. हीच भीती-निश्चिती. या तंत्राचा उपयोग अति तणावपूर्ण वातावरणात टिकाव धरण्यासाठी होतो. तसंच आपल्या नियंत्रणाखाली असणाऱ्या आणि नसणाऱ्या गोष्टी ओळखण्यासाठीही होतो.

शाहरुख खान: मानवजात, प्रसिद्धी आणि प्रेमाबद्दलचे विचार

TED2017

शाहरुख खान: मानवजात, प्रसिद्धी आणि प्रेमाबद्दलचे विचार


हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे आघाडीचे नायक असलेले शाहरुख खान म्हणतात, "मी स्वप्ने विकतो आणि कोट्यावधी लोकांच्या घरांत प्रेम वाटतो." या आनंददायक, मजेशीर व्याख्यानात खान त्यांच्या आयुष्याची कमान शोधतात, त्यांच्या प्रसिद्ध अशा काही नृत्याच्या चाली दाखवतात आणि झगमगाटात जगलेल्या आयुष्यातून कष्टाने मिळवलेली बुद्धिमत्ता वाटतात.

लिसा जिनोव्हा: अल्झायमर्सला प्रतिबंध करण्यासाठी काय कराल?

TED2017

लिसा जिनोव्हा: अल्झायमर्सला प्रतिबंध करण्यासाठी काय कराल?


न्युरोसायन्टिस्ट आणि 'स्टील अलीस' या चित्रपटाच्या लेखिका लिसा जिनोव्हा म्हणतात की. "अल्झायमर्स तुमच्या मेंदूचे भवितव्य असता कामा नये" आधुनिक शास्त्रीय शोध आणि खात्रीशीर संशोधनाच्या मदतीने आपण कोणत्या उपायांनी मेंदूला अल्झायमर्स होण्यापासून थोपवू शकतो याची त्यांनी इथे माहिती दिली आहे.

संगू डेले: मानसिक आरोग्य सांभाळण्याची लाज बाळगू नका.

TEDLagos Ideas Search

संगू डेले: मानसिक आरोग्य सांभाळण्याची लाज बाळगू नका.


जेव्हा उद्योजक संगू डेले यांना ताण असह्य झाला, तेव्हा त्यांना स्वतःच्याच मनात खोल रुजलेल्या एका समजुतीचा सामना करावा लागला. पुरुषांनी मानसिक आरोग्याची काळजी घ्यायची नसते, ही ती समजूत. भावनाप्रदर्शन सहन न करणाऱ्या समाजात आपण चिंताविकाराचा सामना करायला कसे शिकलो, ते डेले आपल्या या भाषणात सांगताहेत. ते म्हणतात, आपल्या भावना बोलून दाखवण्यामुळे आपलं दुबळेपण नव्हे, तर केवळ मनुष्यपण सिद्ध होतं.

झुबैदा बाई: विकसनशील देशासाठी बाळंत साहित्य

TED Residency

झुबैदा बाई: विकसनशील देशासाठी बाळंत साहित्य


TED Fellow झुबैदा बाईनी विकसनशील देशात बाळंत पणात होणाऱ्या मृत्यू टाळण्यासाठी निर्जंतुक साहित्य त्यार्ल केले असून त्याचा वापर करून महिलाच्या आरोग्याची जपणूक केली आहे.

सलील दुडानी: तुरुंगामध्ये गरीबांचा कसा  होतोय छळ?

TEDxStanford

सलील दुडानी: तुरुंगामध्ये गरीबांचा कसा होतोय छळ?


गरीब असल्याकारणाने आपण लोकांना तुरुंगात का पाठवतो? आज, अर्धा लक्ष अमेरिकन जेलमध्ये आहेत केवळ ते अटकेनंतर जामीन देऊ शकत नाहीत , आणि अजून बरेच डांबलेले आहेत कारण त्यांची कर्जे थकली आहेत, कधीकधी अगदी पार्किंग तिकिटाच्या क्षुल्लक कारणासाठी तुरुंगवास भोगत आहेत. सलील दुडानी अशा अनेकांच्या कथा व्यक्त करतात, ज्यांनी मिसूरी राज्यातील फर्ग्युसन शहरात कारावास भोगला. अशा गोष्टी ज्या "गरिब वं अल्पसंख्याकांना कशी शिक्षा करावी " ह्याबद्दल आपले विचार बदलायला भाग पाडतात.

जॉर्ज टुलेवस्की: नॅनोटेक्नॉलॉजीतील पुढचं पाऊल.

TED@IBM

जॉर्ज टुलेवस्की: नॅनोटेक्नॉलॉजीतील पुढचं पाऊल.


दरवर्षी संगणकातली सिलिकॉन चिप आकाराने अर्धी होते आणि तिची शक्ती दुपटीने वाढते. त्यामुळे आपली साधनं नेआण करायला आणि वापरायला सोपी होत जातात. पण एका मर्यादेनंतर चिपचा आकार कमी होऊच शकत नाही, तेव्हा पुढे काय? जॉर्ज टुलेवस्की यांनी अतिसूक्ष्म पदार्थांच्या अज्ञात जगावर संशोधन केलं आहे. त्यांचं सध्याचं काम आहे रासायनिक प्रक्रियांवर. या प्रक्रिया कोट्यवधी कार्बन नॅनोट्यूब्सना एकत्र यायला लावतात. आणि निसर्गातले सजीव जसे गुंतागुंतीच्या विविध सुबक रचना करतात, तशाच प्रकारे सर्किट्स बनवायला भाग पाडतात. यातच संगणकाच्या पुढच्या पिढीचं रहस्य दडलं असेल काय?

लाॅरा व्हॅंडरकॅम: रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा कराल ?

TEDWomen 2016

लाॅरा व्हॅंडरकॅम: रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा कराल ?


एका आठवड्यात १६८ तास असतात. आपल्याला ज्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या वाटतात त्यासाठी आपण वेळ कसा काढू शकतो ? वेळ व्यवस्थापनतज्ञ लाॅरा व्हॅंडरकॅम व्यस्त व्यक्तींच्या आयुष्याचा अभ्यास करते व तिने असे शोधून काढले की बऱ्याच अंशी लोक स्वतःच्या आठवड्याच्या कामाचे जरुरीपेक्षा जास्त तास दाखवतात आणि स्वतःसाठी असलेल्या वैयक्तिक कामाचे कमी .लाॅरा आपल्याला अशी काही प्रत्यक्ष धोरणे सांगते जी वापरून आपण आपला वेळ आपल्या मर्जीने घालवून आहे त्या वेळात आयुष्य घडवू शकतो !

जिया जियांग: नकाराच्या १०० दिवसांपासून मी काय शिकलो

TEDxMtHood

जिया जियांग: नकाराच्या १०० दिवसांपासून मी काय शिकलो


नकार: आपल्यापैकी कित्येक जणांना ज्याची भीती वाटते अशा प्रदेशात जिया जियांग धाडसाने संचार करतात. १०० दिवस नकार शोधत - अनोळखी व्यक्तीकडे १०० डॉलर्स उधार मागण्यापासून ते रेस्टॉरंटमध्ये बर्गर पुनर्भरणाची विनवणी करण्यापर्यंत - जियांग यांनी स्वतःला नकारासोबत येणाऱ्या वेदना आणि लाज यांबाबत असंवेदनशील बनवलं आणि या प्रक्रियेत हे शोधलं कि तुम्हाला जे हवं ते केवळ मागण्याने अनेक शक्यता निर्माण होतात जिथे तुम्हाला शेवटाची अपेक्षा असते.

जेन ब्रेआ: आपल्या रोगाचं निदान होत नसेल तर?

TEDSummit

जेन ब्रेआ: आपल्या रोगाचं निदान होत नसेल तर?


पाच वर्षांपूर्वी टेड फेलो जेन ब्रेआ यांना मायालजिक एनसेफॅलोमायोलायटिस, म्हणजेच "क्रोनिक फटिग सिंड्रोम" झाला आणि वाढतच गेला. हा एक अपंगत्व आणणारा विकार आहे. तो अनेक सामान्य हालचालींवर गंभीररीत्या परिणाम करतो. इतका, की तो फार वाढल्यावर साधी चादरींची सळसळदेखील असह्य होते. ह्या हृदयविदारक भाषणात ब्रेआ सांगताहेत, त्यावरच्या उपचारांमध्ये आलेले अडथळे, त्याची अनाकलनीय कारणं आणि शारीरिक परिणाम. तसंच ज्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करणं अत्यंत कठीण आहे, त्यांच्या आयुष्यांबद्दल फिल्म बनवून त्यांची नोंद घेण्याच्या आपल्या कार्याविषयीही त्या बोलताहेत.

आयझॅक लिडस्की: तुमच्यासाठी कुठले वास्तव तुम्ही निर्मित आहात?

TEDSummit

आयझॅक लिडस्की: तुमच्यासाठी कुठले वास्तव तुम्ही निर्मित आहात?


तुम्ही जे पाहता ते वास्तव नसतं, ते असं काहीतरी असतं जे तुम्ही तुमच्या मनात निर्मीता. जेव्हा अनपेक्षित अशा जीवनातील परिस्थितीतून मूल्यवान अंतर्ज्ञान मिळालं तेव्हा आयझॅक लिडस्की हा सखोल विचार स्वतः शिकले. या अंतर्मुख करणाऱ्या, वैयक्तिक व्याख्यानातून ते आपल्याला कारणं, समज आणि भीती त्याग करण्याचं आणि स्वतःच्या वास्तवाचे निर्माते असण्याची उदात्त जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करतात.

युली लिथकॉट-हेम्स: यशस्वी मुलं कशी वाढवावीत - पालकत्वाचा अतिरेक न करता

TED Talks Live

युली लिथकॉट-हेम्स: यशस्वी मुलं कशी वाढवावीत - पालकत्वाचा अतिरेक न करता


लहान मुलांवर अती अपेक्षांचा बोजा टाकून आणि त्यांच्या आयुष्याचे प्रत्येक वळणावर अतिसूक्ष्म व्यवस्थापन करून पालक खरंतर त्यांना मदत करत नाहीत. असं युली लिथकॉट-हेम्स यांना तरी वाटतं. उत्कटतेने आणि उपरोधात्मक विनोदाने, स्टॅनफर्डच्या फ्रेशमेनच्या माजी अधिष्ठाता पालकांनी त्यांच्या मुलांचे यश हे श्रेणी आणि परीक्षेतील गुण यांच्या आधारे ठरवू नये असं सांगतात. त्याऐवजी, त्या म्हणतात, त्यांनी सर्वांत जुनी संकल्पना वापरावी: निरपेक्ष प्रेम द्यावं.

किओ स्टार्क: तुम्ही अनोळखी व्यक्तींशी का बोलायला हवं

TED2016

किओ स्टार्क: तुम्ही अनोळखी व्यक्तींशी का बोलायला हवं


"जेव्हा तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोलता, तुम्ही तुमच्या -- आणि त्यांच्याही रोजच्या आयुष्याच्या अपेक्षित कथेत एक सुंदर व्यत्यय आणत असता," असं किओ स्टार्क म्हणतात. या रंजक व्याख्यानात अनोळखी व्यक्तींबद्दल असलेली आपली मूलभूत अस्वस्थता मागे सारून त्यातील दुर्लक्षित त्या

फ्रांझ फ्रयुडेन्टल: लहान मुलांचे हृदय छिद्र बंद करण्याचा नवा मार्ग

TED2016

फ्रांझ फ्रयुडेन्टल: लहान मुलांचे हृदय छिद्र बंद करण्याचा नवा मार्ग


लहान मुलांच्या हृदयावर उपचार करणारे फ्रांझ फ्रयुडेन्टल यांनी पर्पारिक विणकामाचे तंत्रज्ञान वापरून बोलीवियातील मुलांना बरे केले अगदी साध्या व सरळ उप्याने जो केवळ अर्धा तास चालतो . त्यांची संस्था जगभरातील मुलांना यापासून रोगमुक्त करणार आहे .

गेराल्ड राइल: पनामा प्रकरणातील सत्य पत्रकारांनी कसे उजेडात आणले

TEDSummit

गेराल्ड राइल: पनामा प्रकरणातील सत्य पत्रकारांनी कसे उजेडात आणले


गेराल्ड राइल यांनी 350HUN आधी जगभरातील प[अत्र्कारांचे नेतृत्व करून पनामा प्रकरणातील घोटाळा उजेडात आणला चाळीस वर्षातील ११.५ दशलक्ष कागदपत्रे एक कोटी इमेल जे पनामा स्थित एका कायदेशीर`कायदा कंपनीचे होते व ज्यात देशाबर कर चुकवून गुंतवणूक करणाऱ्यांची माहिती होती हि पत्रकारितेची अनोखी कहाणी आहे

अँथनी गोल्ड्ब्लूम: यंत्रांपुढे मुकावी लागणारी आपली कामं -- आणि न लागणारीही

TED2016

अँथनी गोल्ड्ब्लूम: यंत्रांपुढे मुकावी लागणारी आपली कामं -- आणि न लागणारीही


यंत्रांचे स्वअध्ययन हे केवळ पत जोखमीचे मूल्यांकन आणि टपालाचे वर्गीकरण यांसारख्या सोप्या कामांसाठी नव्हे -- आज त्याची क्षमता निबंध तपासणे आणि रोगनिदान करणे यांसारखी क्लिष्ट कामं करण्याची आहे. या प्रगतीमुळे एक अस्वस्थ करणारा प्रश्न पडतो: भविष्यात यंत्रमानव तुमचं काम करेल काय?

लैला होटीईट: यशस्वी व्हा! एका अरब व्यावसायिक महिलेने दिलेले तीन धडे.

TED@BCG Paris

लैला होटीईट: यशस्वी व्हा! एका अरब व्यावसायिक महिलेने दिलेले तीन धडे.


व्यावसायिक अरब महिलांना, त्यांच्या तोडीच्या पुरुषांपेक्षा, जास्त जबाबदाऱ्या पेलण्याची कसरत करावी लागते. आणि त्यांना पाश्चिमात्य महिलांपेक्षा जास्त कडव्या संस्कृतीचा सामना करावा लागतो. त्यांचं यश आपल्याला जिद्द, स्पर्धा, आयुष्यातल्या प्राधान्य देण्याच्या गोष्टी आणि प्रगती याबद्दल काय शिकवू शकेल? अबु धाबीतील एक इंजिनीयर, वकील आणि आई म्हणून आपल्या करियरचा मागोवा घेत, लैला होटीईट आधुनिक जगात प्रगती करण्याचे तीन धडे देताहेत.

शुभेंदु शर्मा: परसात वनराई कशी फुलवावी

TED@BCG Paris

शुभेंदु शर्मा: परसात वनराई कशी फुलवावी


वनराई म्हणजे मानवी जीवनापासून दूर असलेला नैसर्गिक संपत्तीचा साठा नसावा. आपण जिथे आहोत - अगदी शहरांतसुद्धा - तिथेच ती वाढवू शकतो. पर्यावरणप्रेमी उद्योजक आणि TED चे सहकारी असलेले शुभेंदु शर्मा शहरांमधे घनदाट, जैवविविधतेने नटलेली आणि मूळ प्रजाती असलेली वनराई माती, जीवाणू आणि बायोमासवर प्रक्रिया करून नैसर्गिक वाढीची सुरुवात होण्यासाठी फुलवतात. १०० वर्षं जुनी वाटावी अशी वनराई केवळ १० वर्षांत कशी फुलवावी आणि तुम्हीही या वनसंमेलनात कसे सहभागी होऊ शकता हे त्यांच्या या वर्णनातून जाणून घ्या.

टॉम हल्म: पायवाटा काय शिकवितात ?

TED2016

टॉम हल्म: पायवाटा काय शिकवितात ?


लोकांना हवं असलेलं उत्पादन प्रॉडक्ट कसं बनवाल ? ग्राहकांनाही या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्या. "ग्राहकांना काय हवंय हे समजून घेणे हाच यशाचा सर्वात मोठा दर्शक आहे " असे डिसाईनर टॉम हल्म सांगतात. या व्याख्यानामध्ये हल्म डिसाइन आणि त्यांचा ग्राहकांनी केलेला वापर, यांची सांगड घालणारी ३ उदाहरणे देऊन केला आहे. ग्राहक त्यांचे स्वतःचे शॉर्टकट्स शोधून काढतात. हे शॉर्टकट्स कसे शोधून काढायचे हे तुम्हाला कळले , कि मग सगळीकडेच ते तुमच्या नजरेस येतील.

संजय सॅम्युएल: महाविद्यालात मिळणाऱ्या शिक्षण कर्जाने कशी पिळवणूक होते

TEDxPSU

संजय सॅम्युएल: महाविद्यालात मिळणाऱ्या शिक्षण कर्जाने कशी पिळवणूक होते


संजय साम्युल म्हणतात "एके काळी अमेरिकेतून पदवी मिळविणे म्हणजे कर्जबाजारी होणे नव्हते. उच्च शिक्षण घेणे महाग झाले असून यासाठी कर्ज देणाऱ्या संस्था नफेखोरी करीत असून यातून एकप्रकारची पिळवणूक होत असते.

शाओलॅन स्यूह: चीनी राशीचक्र समजून घेताना

TED2016

शाओलॅन स्यूह: चीनी राशीचक्र समजून घेताना


जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या चिनी राशीचक्राला मानते. शाओलॅन स्यूह या तंत्रज्ञ आणि उद्योजिकेच्या म्हणण्यानुसार जरी तुमचा त्यावर विश्वास नसला तरी ते कसं असतं हे जाणून घेण्यात तुम्हाला आनंद वाटेल. या मजेशीर आणि माहितगार भाषणात शाओलॅन ही पौराणिक संस्कृती समजून घेण्याच्या काही गोष्टी सांगते आहे आणि याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर, कारकिर्दीवर, लग्न जुळण्यावर आणि एखादं वर्ष कसं जाईल या गोष्टींवर कसा होतो याचं वर्णन करते आहे. तुमचं राशीचिन्ह तुमच्याबद्दल काय सांगतं?

लिडिया युक्नवीच: वेगळेपणातलं सौंदर्य.

TED2016

लिडिया युक्नवीच: वेगळेपणातलं सौंदर्य.


आपण वेगळे आहोत असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी: वेगळं असण्यात सौंदर्य आहे. लेखिका लिडिया युक्नवीच स्वतःच्या आयुष्याचा प्रवास कसा झाला ते सांगताहेत. सर्व काही गमावणे, शरम आणि हळूहळू स्वतःला स्वीकारणे याबद्दलच्या व्यक्तिगत आठवणी जोडून बनलेली गोधडीच जणु. "अपयशाच्या क्षणीदेखील तुम्ही सुंदरच असता," त्या म्हणतात, "त्या वेळी ठाऊक नसलं, तरी स्वतःला पुन्हा एकदा शोधून काढणं सतत शक्य असतं. हेच तुमचं सौंदर्य."

अँड्रयू पेलिंग: हा वेडा शास्त्रज्ञ सफरचंदांपासून कान बनवतो

TED2016

अँड्रयू पेलिंग: हा वेडा शास्त्रज्ञ सफरचंदांपासून कान बनवतो


TED चे सहकारी अँड्रयू पेलिंग जैविक जुगाड करतात आणि निसर्ग हेच त्यांचे साधन आहे. त्यांचं आवडतं साहित्य अत्यंत साधं असतं (आणि बऱ्याचदा त्यांना ते टाकाऊ वस्तूंमध्ये मिळतं). सफरचंदाला ज्याच्यामुळे आकार प्राप्त होतो त्या मूलद्रव्यावर आधारित ते जीवित मानवी कान तयार करतात, हि अशी एक अग्रेसर पद्धत जी एके दिवशी शरीराचे अवयव पुनर्संचयित करण्यासाठी सुरक्षितपणे आणि कमी खर्चात वापरता येईल. आणखी काही भन्नाट कल्पना मांडताना ते म्हणतात..."स्वयंपाकाच्या जिन्नसांपासून एके दिवशी आपल्या शरीराचे पुनर्संचयन, पुनर्बांधणी आणि वाढ होऊ शकेल का याबाबत मी खरा उत्सुक आहे".

कांग ली: मुलांचं खोटं बोलणं तुम्ही ओळखू शकता?

TED2016

कांग ली: मुलांचं खोटं बोलणं तुम्ही ओळखू शकता?


मुलं खोटं बोलण्यात कच्ची असतात का? तुम्हाला वाटतं का, की तुम्ही त्यांचं खोटं बोलणं सहज पकडू शकता? लहान मुलं खोटं बोलतात तेव्हा कोणचे शारिरिक बदल होतात याचा अभ्यास विकसन संशोधक कांग ली करतात. दोन वर्षांची मुलं सुद्धा खोटं बोलतात; आणि ते सुद्धा प्रभावीपणे! मुलांचं खोटं बोलणं आपण साजरं का करायला हवं हे सांगतानाच ली नवीन खोटेपणा पकडण्याचे असे तंत्रज्ञान विशद करतात, जे पुढे जाऊन आपल्या छुप्या भावना उघड करेल!

ख्रिस अँडरसन: TED मधील दिलेली महान व्याख्यानाचे रहस्य

TED Studio

ख्रिस अँडरसन: TED मधील दिलेली महान व्याख्यानाचे रहस्य


सर्व महान टेड वक्त्यांनी दिलेल्या भाषणात एक समान बाब आहे. त्यात काही ठराविक साचा नाही. ख्रिस अँडरसन याचे रहस्य सांगतात. त्यासाठी ते चार मार्ग सुचवितात.

रॉबर्ट पाल्मर: पनामा प्रकरणाने जागतिक घोटाळा जगासमोर आला. पुढे काय?

Global Witness HQ

रॉबर्ट पाल्मर: पनामा प्रकरणाने जागतिक घोटाळा जगासमोर आला. पुढे काय?


३ एप्रिल २०१६ जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस. पनामा प्रकरणाने जगासमोर श्रीमंत व शक्तिशाली लोक देशाबाहेर आपली संपती काळे धन कसे बाहेर नेतात हे उघड झाले .सामान्य माणसाने पेटून उठले पाहिजे. हा पैसा देशाच्या विकासात उपलब्ध होत नाही.

टिम अर्बन: पक्क्या आळशाच्या मनाचा शोध

TED2016

टिम अर्बन: पक्क्या आळशाच्या मनाचा शोध


आळस करण्यात अर्थ नाही, हे टिम अर्बन यांना ठाऊक आहे. पण काम करताना शेवटच्या मिनिटापर्यंत थांबायची त्यांची सवय काही सुटत नाही. आपल्या विनोदी आणि बोधप्रद भाषणात अर्बन आपल्याला प्रवास घडवतात, यूट्यूबच्या व्यसनाचा, विकिपीडियात हरवण्याचा आणि खिडकीबाहेर रमण्याचा. आपलं आयुष्य संपण्यापूर्वी, आपण कशाचा आळस करीत आहोत, त्यावर विचार करण्याचा ते आपल्याला आग्रह करतात.

जेसिका लाड: बलात्कारास बळी पडलेल्यासाठी तक्रारीची सुरक्षित यंत्रणा

TED2016

जेसिका लाड: बलात्कारास बळी पडलेल्यासाठी तक्रारीची सुरक्षित यंत्रणा


आपल्याला अशा जगात राहता य्रेणार नाही ज्यात ९९ टक्के बलात्कारी सुटतात.महाविद्यालयीन तरुणासाठी जेसिका लाड अशी यंत्रणा उभारण्यावर भर देतात .ज्यामुळे अशांबाबत तक्रार करण्याचे बळ मिळेल .तेही त्यांच्याबाबत गोपनीयता राखून.अशा जगाची निर्मिती करता येईल ज्यात मानवी हक्काची पायमल्ली करणाऱ्या गुन्हेगारास कडक शिक्षा होईल

मिलेहा सोनेजी: पार्किन्सन्स बरोबरच्या आयुष्यावर साधे उपाय

TEDxDelft

मिलेहा सोनेजी: पार्किन्सन्स बरोबरच्या आयुष्यावर साधे उपाय


साधे उपाय बरेचदा सर्वोत्तम असतात, अगदी पार्किन्सन्स सारख्या गुंतागुंतीच्या विषयावर सुध्दा. या प्रेरणादायी भाषणात मिलेहा सोनेजी दाखवताहेत उपलब्ध रचना, ज्या पार्किन्सन्स बरोबर आयुष्य जगणाऱ्या जगणाऱ्या लोकांची रोजची कामं थोडी सुलभ करतात. "तंत्रज्ञान हेच काही सर्व प्रश्नांचं उत्तर नव्हे," त्या म्हणतात. "आपल्याला हवीत माणसाला केंद्रस्थानी ठेवून शोधलेली उत्तरं."