TED Talks with Marathi transcript

एमी कुडी: तुमची देहबोली ठरविते  तुम्ही कोण आहात

TEDGlobal 2012

एमी कुडी: तुमची देहबोली ठरविते तुम्ही कोण आहात
56,233,256 views

आपली देहबोली इतरांवर प्रभाव टाकते .पण इतरांच्या देहबोलीचा आपल्यावरही प्रभाव पडतो. सामाजिक मानसोपचारतज्ञा अमी कुडी सांगतात" तुमच्याजवळ आत्मविश्वास नसला तरी, आत्मविश्वास असल्याची देह्बोली करून तुमच्या मेंदूतील टेस्टोस्टेरोन व कोर्टिसोल यांच्या पातळीत बदल होतो व त्यामुळे यास मिळू शकते" .

मैक्स लिटल: एका फोन कॉलवरून पार्किन्सन्सची चाचणी: Max Little: A test for Parkinson’s with a phone call

TEDGlobal 2012

मैक्स लिटल: एका फोन कॉलवरून पार्किन्सन्सची चाचणी: Max Little: A test for Parkinson’s with a phone call
1,296,740 views

पार्किन्सन्सचा विकार जगात ६.३ दशलक्ष लोकांना होतो. तो अशक्तपणा आणि कंप निर्माण करतो. पण त्याचं निदान लवकर करण्यासाठी वस्तुनिष्ठ मार्ग अजून तरी उपलब्ध नव्हता. उपयोजित गणितज्ञ आणि टेड फेलो मैक्स लिटल एक सोपे आणि स्वस्त साधन तपासत आहेत, जे चाचण्यांमध्ये पार्किन्सन्सचं निदान ९९% अचूक करू शकतं - एका ३० सेकंदाच्या फोन कॉलमध्ये.

मार्गारेट हेफरनन: Margaret Heffernan: Dare to disagree

TEDGlobal 2012

मार्गारेट हेफरनन: Margaret Heffernan: Dare to disagree
3,921,245 views

संघर्ष टाळणे ही बहुतांश लोकांची नैसर्गिक प्रवृत्ती असते, पण मार्गारेट हेफरनन आपल्याला सांगतात की चांगले मतभेद हे प्रगतीचा केंद्रबिंदू असतात. त्या दाखवतात की (काही वेळेस अंतर्ज्ञानाच्या विरोधात जाऊन) उत्तम सहकारी नुसती री ओढण्याच काम करत नाहीत - आणि उत्तम संशोधक संघ, नाती आणि उद्योग हे लोकांमधल्या गहन संघर्षाला अनुमत करतात.

उस्मान रियाझ + प्रेस्टन रीड: एक तरुण गिटारवादक त्याच्या नायकाला भेटतो

TEDGlobal 2012

उस्मान रियाझ + प्रेस्टन रीड: एक तरुण गिटारवादक त्याच्या नायकाला भेटतो
5,260,414 views

उस्मान रियाझ २१ वर्षीय उत्तम गिटार वादक आहे, आणि तो ज्या पद्धतीने गिटार वाजवतो त्याने ती त्याच्या हीरोचे यु ट्यूबवर विडीओ बघून शिकला. टेड ग्लोबल २०१२ च्या मंचावर टेड फेलो वादन करतो-- नंतर लगेच अचंबित करणारा प्रविण्यापूर्ण प्रेस्टन रीड यांचे वादन. आणि दोन्ही गिटार वादक काही क्षणात सुधारित वादन सादर करतात.

अलाना शेख: अलाना शेख: स्मृतिभ्रंशाला सामोरे जाताना.

TEDGlobal 2012

अलाना शेख: अलाना शेख: स्मृतिभ्रंशाला सामोरे जाताना.
1,629,194 views

स्मृतिभ्रंशाशी लढण्याऱ्या आई-वडिलांकडे पाहून अनेकदा आपण आपल्यालाही असे काही होऊ शकते ह्याची शक्यता नाकारतो किंवा हा आजार टाळण्यासाठी अतिरेकी उपाय अवलंबवतो. पण टेड व्याख्याती अलाना शेख ह्याकड़े एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. त्या आपल्याला त्यांनी अवलंबवलेल्या तीन प्रमुख उपायांबद्दल सांगतात - की ज्यांच्या आधाराने त्या वेळ पडल्यास स्मृतिभ्रंशाला सामोऱ्या जाऊ शकतील.

वुल्फगँग केसलिंग: खुल्या जागा वातानुकूलित कशा कराव्यात?

TEDxSummit

वुल्फगँग केसलिंग: खुल्या जागा वातानुकूलित कशा कराव्यात?
741,582 views

कडक उन्हाळ्याच्या महिन्यांत, खुल्या जागेत एखादा खेळाचा सामना पाहणं किंवा एखादी मैफिल ऐकणं म्हणजे जणु उन्हात भाजून हैराण होणं. त्यावर तोडगा आहे. दोहा मधल्या टेड एक्स संमेलनात, भौतिकशास्त्रज्ञ वुल्फगँग केसलिंग सांगताहेत, नवनिर्मित स्वयंपोषी रचनांबद्दल. त्या वापरून आपण वरून आणि खालून हवा थंड करू शकतो, शिवाय भविष्यात वापरण्यासाठी सौरऊर्जा साठवू शकतो.

क्यूज़ोटिक फ्यूजन (विलक्षण विलय): प्रकाशाबरोबर नृत्य

TED2012

क्यूज़ोटिक फ्यूजन (विलक्षण विलय): प्रकाशाबरोबर नृत्य
1,599,803 views

क्यूज़ोटिक फ्यूजन (विलक्षण विलय) एक साथ हवाई कलाबाजी, नृत्य, थियेटर, फिल्म, संगीत आणि दृश्य एफएक्स आणतो, कलाकारांना त्यांच्या टेड२०१२ वरील तीन परिवहन नृत्य टुकड़े प्रदर्शन रुपात बघा.

Joe Smith: कागदी रुमाल कसा वापरावा

TEDxConcordiaUPortland

Joe Smith: कागदी रुमाल कसा वापरावा
3,684,496 views

तुमचे हात कोरडे करण्यासाठी तुम्ही कागदी रूमाल दररोज वापरता. परंतु शक्यता आहे की , हे तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहात . या माहितीपूर्वक आणि विनोदी भाषणात, उलगडून सांगत आहेत जो स्मिथ कागदी रुमाल वापरण्याच्या उत्कृष्ट पद्धती . (Filmed at TEDxConcordiaUPortland.)

टेलर विल्सन: हो, मी परमाणु संलयन प्रतिक्रिया करणारे संयत्र बनविले

TED2012

टेलर विल्सन: हो, मी परमाणु संलयन प्रतिक्रिया करणारे संयत्र बनविले
3,637,296 views

टेलर विल्सन विश्वास ठेवतो की परमाणु संलयन एक भविष्यातल्या उर्जेसाठी समाधान आहे आणि मुले जे जग बदलू शकतात . आणि तो जेंव्हा १४ वर्षांचा होता तेंव्हा त्याने त्याच्या गराजमध्ये परमाणु संलयनवर काम करायला सुरुवात केली. आत्ता तो १७ वर्षांचा टेड मंचवर--

एका 'टेड' वक्त्याचे भयानक स्वप्न

TED2012

एका 'टेड' वक्त्याचे भयानक स्वप्न
3,347,194 views

कोलीन रॉबर्ट्सन यांना 'टेड'च्या व्यासपीठावर त्यांच्या सूर्य किरणांपासून ऊर्जा निर्माण करणार्‍या जन समूह स्रोत (crowdsourced) तंत्रज्ञानाबद्दल बोलायला तीन मिनिटं मिळाली आणि, अचानक....

विजय कुमार: यंत्रमानव, जे उडतात ... आणि एकमेकांना सहकार्य करतात

TED2012

विजय कुमार: यंत्रमानव, जे उडतात ... आणि एकमेकांना सहकार्य करतात
5,188,706 views

पेन विद्यापीठच्या प्रयोगशाळेत विजय कुमार आपल्या टीमसोबत बनवतात, चार पंख असलेले, छोटे, आणि चपळ असे यंत्रमानव, जे एकमेकांची चाहूल घेतात, आणि तात्पुरत्या टीम्स बनवतात - बांधकाम, दुर्घटना स्थळाची टेहळणी आणि अशा बर्‍याच कामांसाठी.

शॉन एकोर: चांगल्या कामाचं सुखी गुपीत

TEDxBloomington

शॉन एकोर: चांगल्या कामाचं सुखी गुपीत
21,573,773 views

आपण असं मानतो कि आनंदी राहण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, पण हे उलटं असू शकतं का? TEDx ब्लूमिंग्टन मधील या वेगवान आणि करमणूकप्रधान व्याख्यानात मानसशास्त्रज्ञ शॉन एकोर म्हणतात कि खरंतर आनंदानेच उत्पादकता प्रेरित होते.

  मोनिका बुलाज:अफगाणिस्तानचा दडलेला प्रकाश

TEDGlobal 2011

मोनिका बुलाज:अफगाणिस्तानचा दडलेला प्रकाश
669,507 views

मोनिका बुलाज,छायाचित्रकार आपल्या अफगाणी सफरीच्या आठवणींना उजाळा देत आहेत--अफगाणी स्त्रिया व पुरुष--तिथल्या अंतर्गत बाता. आपल्याला या दहशतवादाच्या केंद्राबिंदुबाबत खरोखरच माहिती आहे का?

जुलियन ट्रेजर: उत्तम श्रवणाचे ५ मार्ग

TEDGlobal 2011

जुलियन ट्रेजर: उत्तम श्रवणाचे ५ मार्ग
8,060,876 views

आपल्या तारस्वरातील आणि गोंगाट असलेल्या जगात, ध्वनी तज्ञ ज्युलिअन ट्रेजर म्हणतात, "आपण श्रवण करणं हरवतो आहोत." या छोट्या, आकर्षक व्याख्यानात, इतरांना आणि तुमच्या भोवतालच्या जगाला जाणीवपूर्वक ऐकण्यासाठी तुमचे कान तयार करण्याकरता ट्रेजर ५ मार्ग सांगतात.

पक्ष्यांप्रमाणे उडणारा यंत्रमानव

TEDGlobal 2011

पक्ष्यांप्रमाणे उडणारा यंत्रमानव
8,646,669 views

बरेच यंत्रमानव उडू शकतात पण त्यापैकी कोणताही एखाद्या खऱ्या पक्ष्याप्रमाणे उडू नाही शकत. हे करून दाखवलंय फेस्टो च्या मार्कस फिशर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेव्हा त्यांनी बनविला सागरी पक्षी सी-गल(Seagull) वर आधारित एक आकाराने मोठा, अतिशय हलका यंत्रमानव -स्मार्ट बर्ड (smartBird) - जो फक्त पंखांची उघडझाप करून उडू शकतो. एक ( अपेक्षा ) उंचावणारे प्रदर्शन थेट टेडग्लोबल (TEDGlobal) 2011 मधून.

नेथन म्य्हव्रोल्द : स्वयंपाका मागचे विज्ञान!

TED2011

नेथन म्य्हव्रोल्द : स्वयंपाका मागचे विज्ञान!
1,606,673 views

पाक-कला पुस्तकांचे लेखक (आणि पुस्तकी-किडा) नेथन म्यह्र्वोल्द "नव-खाद्य संस्कृती" ह्या विषयावर बोलतील आणि त्यांच्या खाद्य पदार्थांच्या विस्मयकारी छबिनमागील गुपितही उलगडतील. ह्या छबी विविध पाक-कृतींचा उभा छेद दाखवितात.

मॅट कट्स : ३० दिवस काहीतरी नवीन करून बघा.

TED2011

मॅट कट्स : ३० दिवस काहीतरी नवीन करून बघा.
12,215,040 views

असा काही आहे जे तुम्ही करणे नेहमीच अभिप्रेत होतं, तुम्हाला करायची इच्छा होती, पण कधी ... केलेच नाही? मॅट कट्स सुचवतात: ३० दिवस प्रयत्न करून तर पहा. ही छोटी आणि हलकी-फुलकी चर्चा; ध्येय ठरविण्याचा आणि प्राप्तीचा एक पद्धतशीर मार्ग सुचवून जाते.

राजेश रावः सिंधू लिपीची गुरुकिल्ली

TED2011

राजेश रावः सिंधू लिपीची गुरुकिल्ली
2,103,451 views

राजेश राव भारावून गेले आहेत 'जगातल्या सर्वात कठीण शब्दकोड्यामुळे'. (ते म्हणजे) ४००० वर्षांपूर्वीच्या सिंधू लिपीची उकल करणे.'TED 2011' या कार्यक्रमात ते सांगतात आधुनिक गणनात्मक कार्यप्रणालीच्या वापराबद्दल, ज्याची मदत ह्या प्राचीन संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यात होऊ शकते.

जाॅक चर्च: सद्भावनेचे वर्तुळ

TED2007

जाॅक चर्च: सद्भावनेचे वर्तुळ
809,620 views

ह्या ३ मिनिटाच्या संवादात , व्यंगचित्रकार आणि शिक्षक वं लेखक जाॅक चर्च आपल्याला एका अशा शिक्षिकेची गोष्ट सांगतात जिने एकटीने लेखकाची नितांत काळजी घेतली आणि त्या उपकाराची परतफेड लेखकाने कशी केली .

रॉबर्ट गुप्ता + जोशुआ रोमन: व्हायोलिन आणि सेलो वर, "पस्साकाग्लिया"

TED2011

रॉबर्ट गुप्ता + जोशुआ रोमन: व्हायोलिन आणि सेलो वर, "पस्साकाग्लिया"
896,041 views

हे उत्तम वादन व्हायोलिनवादक रॉबर्ट गुप्ता आणि सेलोवादक जोशुआ रोमन यांनी व्हायोलिन आणि व्हायोलासाठी हल्वोर्सेन यांचे "पस्साकाग्लिया" सादर केले आहे. रोमन यांनी व्हायोलाचा भाग त्यांच्या स्त्रंडीव्हेरिअस सेलो वर सादर केला आहे. या दोन संगीतकारांना (सादरीकरणातले अडथळे पार करून) जुगलबंदी करताना बघायचा अनुभव अतिशय रोमांचक आहे. हे दोघे टेड फेलो आहेत, आणि त्यांच्यामधील ताळमेळ जुगलबंदीला बढावा देतो.

अरविंद गुप्ता: टाकाऊ पदार्थातून  बनवा शैक्षणिक खेळणी

INK Conference

अरविंद गुप्ता: टाकाऊ पदार्थातून बनवा शैक्षणिक खेळणी
1,714,028 views

इंक परिषदेत अरविंद गुप्तांनी सांगितलेल्या या साध्या पण प्रभावी योजना टाकाऊ कचऱ्यात पडलेल्या वस्तूंपासून उत्तम मनोरंजन करणारी, सुरेख रचनेची विज्ञान शिकविणारी खेळणी कशी बनवायची -- जी मुलं स्वत:च बनवू शकतात आणि त्यातूनच विज्ञान आणि संरचनाशास्त्राची मूलभूत तत्त्वं शिकू शकतात.

ब्रुस श्नायर: सुरक्षिततेचे मृगजळ

TEDxPSU

ब्रुस श्नायर: सुरक्षिततेचे मृगजळ
958,315 views

सुरक्षिततेची भावना आणि सुरक्षिततेचे वास्तव हे नेहमी एकच असतात असे नाही, असे म्हणतायत संगणक-सुरक्षातज्ञ ब्रुस श्नायर. TEDxPSU मध्ये, ते समजावत आहेत आपण वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या बनलेल्या धोक्यांवर करोडो रुपये का खर्च करतो, जसे की तुमच्या जवळील विमानतळावर सुरू असलेल्या 'सुरक्षिततेच्या नाटकावर', आणि त्याचवेळी जास्त शक्यता असलेल्या धोकादायक गोष्टींकडे डोळेझाक करतो -- आणि आपण हे कसे बदलू शकतो.

इंग्रजी भाषेचा/माध्यमाचा आग्रह करू नका.

TEDxDubai

इंग्रजी भाषेचा/माध्यमाचा आग्रह करू नका.
2,138,668 views

दुबईतील TEDx मध्ये, अनुभवी इंग्रजी शिक्षिका पेट्रीशिआ रायन हा जिज्ञासा निर्माण करणारा प्रश्न विचारतायत: जगाच्या इंग्रजी भाषेवर असणाऱ्या अतिप्रभावामुळे इतर भाषांमध्ये व्यक्त होणाऱ्या कल्पनांकडे दुर्लक्ष होत आहे काय? (उदा: जर आइनस्टाइनला टोफेल परीक्षा पास व्हावी लागली असती तर?) हा इतर भाषांमध्येही कल्पना मांडू द्याव्यात असा आधार देणारा संवाद आहे.

मार्क बेझोस: आयुष्यावरचा धडा - एका अग्निशमन स्वयंसेवकाकडून

TED2011

मार्क बेझोस: आयुष्यावरचा धडा - एका अग्निशमन स्वयंसेवकाकडून
3,120,225 views

अग्निशमन स्वयंसेवक मार्क बेझोस सांगतात एका साहसाची गोष्ट जी फार काही हवी तशी घडली नाही -- पण ज्याने त्यांना एक धडा शिकविला: नायक व्हायची वाट पाहू नका.

एली पॅरिसर : ऑनलाईन "संगणकीय पिंजऱ्या"पासून सावध व्हा.

TED2011

एली पॅरिसर : ऑनलाईन "संगणकीय पिंजऱ्या"पासून सावध व्हा.
5,309,238 views

जसजसे वेब कंपन्या प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यांच्या सेवांचे (बातम्या आणि सर्चचे निकाल) वैयक्तीकरण करत आहेत, त्यातून एक धोकादायक अनपेक्षित परिणाम होत आहे : आपण एका संगणकीय पिंजऱ्यात अडकले जातो आणि अशा माहितीपासून वंचित राहतो ज्यामुळे विश्वकल्पनेबद्दलच्या विचारांना आवाहन मिळेल किंवा त्यांचा विस्तार होऊ शकेल. एली पॅरिसर एक समर्थ युक्तीवाद करतात की शेवटी हे आपल्यासाठी आणि लोकसत्तेसाठी अपायकारक आहे.

Brené Brown: ब्रेने ब्राउन: अगतिकतेची शक्ती

TEDxHouston

Brené Brown: ब्रेने ब्राउन: अगतिकतेची शक्ती
46,319,192 views

ब्रेने ब्राऊन ह्या मानवी नातेसंबंधांचा अभ्यास करतात -- आपल्या (मानवी) सहानुभूती, आपलेपणा, प्रेम व्यक्त करण्याच्या क्षमतांचा. टेडएक्स ह्युस्टन येथे झालेल्या एका गुदगुल्या करण्याऱ्या, नेमक्या भाषणात त्या त्यांच्या संशोधनातून निष्पन्न झालेली अनुभूती कथन करतात जी त्यांना, स्वतःला आणि मानवतेला जाणण्याच्या एका वैयक्तिक शोधमोहीमेवर घेऊन गेली. एक सर्वांशी वाटून घ्यावं असं भाषण.

डायना लॉफेनबर्ग: चुकांतून कसे शिकावे?

TEDxMidAtlantic

डायना लॉफेनबर्ग: चुकांतून कसे शिकावे?
2,232,346 views

डायना लॉफेनबर्ग आपल्याला सांगतायत शिकविण्याबद्दलच्या ३ आश्चर्यकारक गोष्टी -- ज्यातील एक आहे चुकांतून शिकण्यासंबंधीची महत्त्वाची अंतर्दृष्टी.

किरण बेदी : एक आगळी वेगळी पोलिस प्रमुख

TEDWomen 2010

किरण बेदी : एक आगळी वेगळी पोलिस प्रमुख
1,401,566 views

किरण बेदी यांचा अल्प परिचय आश्चर्यकारक आहे. भारतीय पोलिस सेवा दलात महासंचालक होण्यापूर्वी त्यांनी देशातील एक अत्यंत उपद्रवी तुरुंग नियंत्रित केला--आणि प्रतिबंध आणि शिक्षण नव्याने केंद्रस्थानी ठेवून त्याचा उपयोग तुरुंगाचे एक शैक्षणिक आणि ध्यान धारणा केंद्रामध्ये रुपांतर करण्यास केला. TEDWomen साठी त्या दूरदर्शी नेतृत्वाबाबत आपले विचार मांडत आहेत .

अगदी  स्वस्त  वस्तूच्या  आराखड्याचा  शोध.

TEDIndia 2009

अगदी स्वस्त वस्तूच्या आराखड्याचा शोध.
709,238 views

इंजिनिअर रघुनाथ माशेलकर आपल्याला सांगत आहेत भारतामधील तीन कथा -- स्वस्त वस्तूच्या आराखड्याच्या संबंधातील – जे बनविताना तळापासून फेर विचार आणि विशेष तंत्रज्ञान वापरून मोटार गाडया , उपकरणी , सारख्या महाग वस्तू सर्वांच्या आवाक्यात येतील .

सुगत  मित्रा  यांचे  स्वाध्यायाचे  नवे  प्रयोग

TEDGlobal 2010

सुगत मित्रा यांचे स्वाध्यायाचे नवे प्रयोग
3,097,850 views

शिक्षणशास्त्रतज्ञ सुगत मित्रा हाताळत आहेत एक मोठा शैक्षणिक प्रश्न - सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी चांगले शिक्षक व चांगल्या शाळा नसणे . दिल्ली पासून दक्षिण आफ्रिका , इटली पर्यंतच्या स्वानुभवावर आधारित उपक्रमांमधून त्यांनी मुलांना दिली स्व-नियंत्रित वेब सुविधा आणि त्यातून प्रकटले क्रांतिकारी निष्कर्ष, शिक्षणविषयक दृष्टीकोन बदलणारे.