TED Talks with Marathi transcript

डेरेक सिव्हर्स (Derek Sivers): तुमची ध्येये कुणालाही सांगू नका

TEDGlobal 2010

डेरेक सिव्हर्स (Derek Sivers): तुमची ध्येये कुणालाही सांगू नका
6,371,544 views

आपण जेंव्हा आयुष्याची नवीन दिशा आखतो, तेंव्हा साहजिकच आपल्याला ती बातमी कुणालातरी सांगाविशी वाटते. पण डेरेक सिव्हर्स म्हणतात की अशी बातमी गुप्त ठेवलेली जास्त फायद्याची ठरेल. सन १९२०-पासून केलेल्या संशोधनाचा उल्लेख करून ते दाखवून देतात की आपल्या महत्त्वाकांक्षा बोलून दाखवणारे लोक त्या प्रत्यक्षात आणताना कमी यश मिळवतात.

ज्युलियन असांजः जगाला विकीलीक्सची गरज का आहे?

TEDGlobal 2010

ज्युलियन असांजः जगाला विकीलीक्सची गरज का आहे?
2,716,210 views

वादग्रस्त वेबसाईट 'विकीलीक्स' संवेदनशील अधिकृत कागदपत्रं आणि व्हिडीओ मिळवून प्रसिद्ध करते. संस्थापक ज्युलियन असांज, जे चौकशीसाठी अमेरिकी अधिकार्‍यांना हवे आहेत, ते बोलताहेत 'टेड'च्या ख्रिस अँडरसन सोबत, ही साईट कशी चालते, तिनं काय साध्य केलंय - आणि त्यांना स्फूर्ती कुठुन मिळते, यांबद्दल. अमेरिकेनं नुकताच बगदाद वर जो हवाई हल्ला केला त्याचं चित्रणही या मुलाखतीत समाविष्ट आहे.

एलिफ शफाक : साहित्याचे राजकारण

TEDGlobal 2010

एलिफ शफाक : साहित्याचे राजकारण
2,249,017 views

कथा ऐकताना कल्पनांना वाव मिळतो, कथाकथन आपल्याला सांस्कृतिक भिंतींपल्याड नेतं, नवनवे अनुभव कवेत घेता येतात, दुसर्‍यांच्या भावनांशी तादात्म्य पावता येतं. एलिफ शफाक या साध्याशाच कल्पनेचा विस्तार करताना प्रतिप्रादन करत आहेत की साहित्य खुज्या अस्मितांच्या राजकारणावर मात करू शकतं.

मिशेल जोकमः घर बांधू नका, वाढवा!

TED2010

मिशेल जोकमः घर बांधू नका, वाढवा!
1,626,721 views

'टेड' फेलो आणि नगर रचनाकार मिशेल जोकम सादर करतायत त्यांचं ध्येय - टिकाऊ, जैविक वास्तुकलेबद्दल : पर्यावरणपूरक घरं जी वाढवली गेलीत झाडांपासून आणि - अं - मांसापासून.

आनंद शंकर जयंत चा नृत्याद्वारे कर्क रोगाशी लढा.

TEDIndia 2009

आनंद शंकर जयंत चा नृत्याद्वारे कर्क रोगाशी लढा.
806,887 views

प्रसिध्ध भारतीय शास्त्रीय नर्तिका आनंद शंकर जयंत हिला कर्क रोग झाल्याचे निदान २००८ साली झाले . तिच्या आत्मकथनात ती सांगते कि तिने नृत्याच्या माध्यमातून रोगाशी कसा सामना केला आणि ज्यातून तिला बळ मिळाले त्या नृत्याचा आविष्कार .

ज्युलिया स्वीनी यांचे "ते" संभाषण

TED2010

ज्युलिया स्वीनी यांचे "ते" संभाषण
3,719,405 views

जेव्हा ज्युलिया स्वीनींच्या ८ वर्षांच्या मुलीने बेडकांच्या प्रजननाबद्दल शिकण्यास सुरुवात केली - आणि त्यानंतर हुशारीने काही प्रश्न विचारले, तेव्हा सत्यकथनाचा कितीही प्रयत्न केला तरी ज्युलिया स्वीनींना शेवटी धडधडीत खोटे बोलावेच लागले.

अनिल गुप्ता: भारतातील संशोधनाचे सुप्तमंच

TEDIndia 2009

अनिल गुप्ता: भारतातील संशोधनाचे सुप्तमंच
764,089 views

अनिल गुप्ता विकसनशील देशातील अपरिचित संशोधकांच्या शोधात आहेत, असे लोक ज्यांची हुशारी गरिबीने झाकली आहे पण ज्याच्यात लोकांचे आयुष्य बदलून टाकण्याची ताकद आहे. ह्या भाषणात ते दाखवून देतात की अशा लोकांना जोडण्यास 'हनी बी नेटवर्क' कसे मदत करते आणि त्यांना सन्मान मिळवून देते.

सायमन सिनेक: महान नेते कृती करण्यास कसे प्रेरित करतात

TEDxPuget Sound

सायमन सिनेक: महान नेते कृती करण्यास कसे प्रेरित करतात
48,856,581 views

एक सुवर्ण वर्तुळ आणि "का?" या प्रश्नाने सुरु होणारी सायमन सिनेक यांची प्रेरणादायी नेतृत्वावरची एक साधी पण सामर्थ्यवान अशी प्रतिकृती आहे. त्यांची उदाहरणं म्हणजे ऍपल, मार्टिन ल्युथर किंग आणि राईट बंधू -- आणि विरुद्ध मुद्दा म्हणून टिव्हो, जी (नुकत्याच मिळवलेल्या न्यायालयीन विजयामुळे जिच्या शेअरची किंमत तिप्पट झाली) अडखळताना दिसते.

अडोरा स्विटॅक: मोठे लोक मुलांकडून काय शिकू शकतात?

TED2010

अडोरा स्विटॅक: मोठे लोक मुलांकडून काय शिकू शकतात?
6,022,458 views

असामान्य बाल विचारवंत अडोरा स्विटॅक म्हणते आहे की जगाला गरज आहे बालिश विचारपद्धतीची: धीट कल्पनांची, प्रचंड निर्माणक्षमतेची आणि विशेष करून आशादायक विचारपद्धतीची. मुलांच्या मोठ्या स्वप्नांना मोठ्या अपेक्षांची गरज आहे, ती म्हणते : आणि हे प्रौढांच्या फक्त मुलांना शिकवण्याच्याच नाही तर त्याबरोबरच त्यांच्याकडून शिकण्याच्या इच्छेतून सुरू झाले पाहिजे.

शुक्ला बोसः एका वेळी एका मुलाचं शिक्षण

TEDIndia 2009

शुक्ला बोसः एका वेळी एका मुलाचं शिक्षण
1,150,758 views

शुक्ला बोस यांच्या मते, गरीबांचं शिक्षण म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नव्हे. त्या आपल्या परिक्रमा ह्युमॅनिटी फाउंडेशनबद्दल सांगत आहेत, जे निराशाजनक आकडेवारीच्या पलीकडं जाऊन आणि प्रत्येक मुलाला स्वतंत्र व्यक्ती मानून, भारतातील झोपडपट्ट्यांमध्ये आशेचा किरण आणत आहे.

हर्षा भोगले: क्रिकेटचा उत्कर्ष, भारताचा उत्कर्ष

TEDIndia 2009

हर्षा भोगले: क्रिकेटचा उत्कर्ष, भारताचा उत्कर्ष
934,813 views

एका वैश्विक संस्कृतीतील संकल्पनेची कहाणीः क्रिकेट समालोचक हर्षा भोगले बोलताहेत जलद गती २०-२० क्रिकेटच्या नेत्रदीपक आगमनाबद्दल, जे आधुनिक भारताच्या उदयाला समांतर आहे. या खेळाच्या धूसर इंग्रजी मुळांपासून सध्याचे सेलिब्रिटी ओनर व खेळाडूंची लक्षावधी डॉलर्सची कॉन्ट्रॅक्ट्स इथपर्यंतचा त्यांनी घेतलेला मागोवा.

डेरेक सिवर्स : विचित्र की केवळ वेगळं?

TEDIndia 2009

डेरेक सिवर्स : विचित्र की केवळ वेगळं?
3,629,976 views

"प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते." अशी एक म्हण आहे, आणि दोन मिनिटात डेरेक सिवर्स हे दाखवून देतात की, तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा काही गोष्टींबाबतदेखील ही म्हण सत्यात उतरते.

जेन  चेन : जीव  वाचविणारी  उबदार  मिठी

TEDIndia 2009

जेन चेन : जीव वाचविणारी उबदार मिठी
874,886 views

विकसनशील देशात उबवणी उपकरणाच्या उपलब्धतेवर किंमत व अंतर याच्या मर्यादा येतात .. त्यामुळे हजारो अकाली प्रसूत नवजात अर्भके दरवर्षी मरतात . टेड ची सदस्या जेन चेन असे एक नव्याने शोधलेले , सुरक्षित , सुटसुटीत , स्वस्त आणि जीव वाचवणारे उपकरण दाखवते आहे की जे नवजात अर्भकाना उब मिळवून देईल

ललितेश कात्रगड्डा: नकाशांची निर्मिती संकटांचा सामना करण्यासाठी, अर्थव्यवस्था उभारण्यासाठी

TEDIndia 2009

ललितेश कात्रगड्डा: नकाशांची निर्मिती संकटांचा सामना करण्यासाठी, अर्थव्यवस्था उभारण्यासाठी
405,132 views

२००५ पर्यंत फक्त १५ टक्के जग नकाशावर आलं होतं. यामुळं एखाद्या आपत्तीच्या वेळी मदत पोचण्यास विलंब होतो - आणि वापरात नसलेल्या जमिनीची व अपरिचित रस्त्यांची आर्थिक ताकद झाकली जाते. ह्या छोट्याशा बातचितीमध्ये 'गुगल'चे ललितेश कात्रगड्डा दाखवतायत 'मॅप मेकर', एक एकत्रित नकाशा-निर्मिती साधन जे जगभरातल्या लोकांकडून वापरलं जातंय, आपलं जग नकाशावर आणण्यासाठी.

कार्तिक सत्यनारायणन: कशी केली आम्ही "नाचणाऱ्या अस्वलांची सुटका?"

TEDIndia 2009

कार्तिक सत्यनारायणन: कशी केली आम्ही "नाचणाऱ्या अस्वलांची सुटका?"
470,045 views

परंपरेनुसार भारतातील कलंदर जमातीचा उदरनिर्वाह होतो अस्वलांना पकडून , त्यांना शिक्षण देऊन व अत्यंत क्रूरपणे नाचवायला लावून .कार्तिक सत्यनारायणन ह्या मनुष्याने ह्या शेकडो वर्षे चालत आलेल्या दुष्ट प्रकाराला आळा घातला आणि हे करताना एक मोठा धडा शिकवला: एखाद्या व्यवसायातून मुक्ती हवी असेल तर व्यावसायिकांना बदलाच्या प्रक्रियेत सामावून घ्या.

विलायान्नुर रामचंद्रन: न्युराँस जे संस्कृतीचे संवर्धन करतात

TEDIndia 2009

विलायान्नुर रामचंद्रन: न्युराँस जे संस्कृतीचे संवर्धन करतात
2,250,451 views

न्युरोवैज्ञानिक विलायान्नुर रामचंद्रन कथन करतात न्युराँसचे विस्मयकारक कार्य नुकतेच शोधलेले हे न्युराँस आपल्याला जटील सामाजिक वर्तनाचा अर्थ शिकवितात ,त्यातील काही संस्कृतीचा पाया रचणारे आहे.

सुनिता कृष्णनचा लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा लढा.

TEDIndia 2009

सुनिता कृष्णनचा लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा लढा.
4,294,386 views

सुनिता कृष्णनने तिचे आयुष्य स्त्रिया आणि मुलांना लैंगिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी वेचले, (जो) एक करोडो रुपयांचा वैश्विक बाजार आहे. या साहसपूर्ण भाषणात, ती तीन सशक्त गोष्टी सांगते, तसेच स्वतःची सुद्धा, आणि या तरुण सावाजांना त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी अधिक माणुसकीच्या दृष्टीकोनातून मदत करण्याचे आवाहन करते.

देवदत्त पट्टनाईक: पूर्व वि. पश्चिम -- पुराणकथांचे रहस्य.

TEDIndia 2009

देवदत्त पट्टनाईक: पूर्व वि. पश्चिम -- पुराणकथांचे रहस्य.
2,207,034 views

देवदत्त पट्टनाईक आपल्याला घेऊन जात आहेत भारतीय आणि पाश्चात्त्य पुराणकथांच्या जगात. ते आपल्याला सांगतात की या दोन पुराणकथांमधील देव, मृत्यू आणि स्वर्ग या कल्पनांमध्ये मूलभूत फरक आहेत, जे या दोन प्रांतांतील लोकांमध्ये अनेकदा गैरसमज निर्माण करण्यास कसे कारणीभूत असतात.

प्रणव मिस्त्री: प्रणव मिस्त्री: सिक्स्थ सेन्स तंत्राचं रोमांचक सामर्थ्य

TEDIndia 2009

प्रणव मिस्त्री: प्रणव मिस्त्री: सिक्स्थ सेन्स तंत्राचं रोमांचक सामर्थ्य
18,689,186 views

'टेड इंडिया'वर, प्रणव मिस्त्री अशी साधनं प्रदर्शित करतात जी भौतिक जगाला माहितीच्या जगाशी जुळवण्यात मदत करतात। सोबतच, एक नजर त्यांच्या सिक्स्थ सेन्स यंत्र आणि एका नव्या, क्रांतिकारी कागदी लॅपटॉपवर. व्यासपीठावर झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये मिस्त्री म्हणतात की, सिक्स्थ सेन्समागचे सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी खुले असेल, जेणेकरून सगळ्यांसाठी पर्याय उपलब्ध राहतील.

इमाम फैजल अब्दुल रौफः अहंकार सोडा, दयाळू बना

TEDSalon 2009 Compassion

इमाम फैजल अब्दुल रौफः अहंकार सोडा, दयाळू बना
549,886 views

इमाम फैजल अब्दुल रौफ, कुराण, रुमीच्या कथा, आणि मोहम्मद व येशूच्या उदाहरणांतून दाखवून देतात की, आपल्यातील प्रत्येकाला दयाळू बनण्यापासून रोखणारी एकच गोष्ट आहे - आपण स्वतः

स्वामी दयानंद सरस्वतीः करुणेचा अभ्यासपूर्ण शोध

Chautauqua Institution

स्वामी दयानंद सरस्वतीः करुणेचा अभ्यासपूर्ण शोध
414,064 views

स्वामी दयानंद सरस्वतींनी, वैयक्तिक विकास व करुणेच्या जाणीवेचे समांतर मार्ग आपल्यासमोर उलगडले आहेत. असहाय्य अर्भकावस्थेपासून, इतरांची काळजी घेण्याइतपत निर्भय होण्यापर्यंतच्या आत्मबोधाच्या सर्व पायर्‍या ते आपल्याला दाखवतात.

बो लोटो: दृष्टिभ्रम दाखवतात आपण कसे पाहतो

TEDGlobal 2009

बो लोटो: दृष्टिभ्रम दाखवतात आपण कसे पाहतो
7,158,267 views

बो लोटो यांचे रंगीत खेळ तुमच्या नजरेला कोड्यात टाकतात, पण ते "तुमचा मेंदू काम कसा करतो" यावरही प्रकाश टाकतात. तुमच्या अष्टपैलू दृष्टीचे हे मजेदार दर्शन तुम्हाला तुमच्या सत्याच्या आकलनक्षमतेवर उत्क्रांतीने केलेला परिणाम दाखवून देईल.

विल्यम काम्कवांबा: मी वारयाचा वापर कसा केला.

TEDGlobal 2009

विल्यम काम्कवांबा: मी वारयाचा वापर कसा केला.
2,717,871 views

वयाच्या चौदाव्या वर्षी, गरिब आणी दुष्काळी परिस्थितीत एका मलावीय मुलाने स्वत:च्या कुटुंबाला वीज पुरवण्यासाठी पवनचक्की बांधली. आता वयाच्या बाविसाव्या वर्षी, विल्यम काम्कवांबा टेड येथे दुसरयांदा बोलतांना स्वत:च्याच शब्दात त्याच्या शोधाची कहाणी सांगत आहे ज्याने त्याचे आयुष्य बदलून टाकले.

ब्याके इन्येल्स : वास्तूरचनेच्या ३ रंजक कथांचा झपाटा

TEDGlobal 2009

ब्याके इन्येल्स : वास्तूरचनेच्या ३ रंजक कथांचा झपाटा
2,575,938 views

डॅनिश वास्तुशिल्पी ब्याके इन्येल्स आपल्याला दृकश्राव्य कथांच्या सफारीतून सांगत आहे त्याच्या लखलखत्या पर्यावरणीय संरचनांबद्दल. त्याच्या इमारती केवळ नैसर्गिक दिसत नाहीत तर त्या निसर्गाची कार्येदेखील करतात: वारा अडवतात, सौरउर्जा साठवतात आणि खिळवून ठेवतात.

डॅन पिंक: प्रोत्साहनाचं कोडं

TEDGlobal 2009

डॅन पिंक: प्रोत्साहनाचं कोडं
25,352,736 views

पारंपारिक पुरस्कार नेहमी आपल्याला वाटतात तेवढे परिणामकारक नसतात हि वस्तुस्थिती जी समाजशास्त्रज्ञांना माहिती आहे पण व्यवस्थापकांना नाही या गोष्टीने सुरुवात करत कारकीर्द विश्लेषक डॅन पिंक प्रोत्साहनाचं कोडं तपासून बघतात. त्यांचे बोधप्रद किस्से ऐका -- आणि कदाचित तो भविष्यातील मार्ग असेल.

गेवर टली देताहेत आयुष्याचे धडे उचापती आणि खुडबुडी करण्यातून!

TED2009

गेवर टली देताहेत आयुष्याचे धडे उचापती आणि खुडबुडी करण्यातून!
1,292,811 views

गेवर टली आकर्षक चित्रं आणि छायाचित्रणांमधून आपल्याला दाखवतायत की त्यांच्या शाळेमध्ये मुलं मौल्यवान शिक्षण कसं मिळवतात. हत्यारं , कच्चा माल आणि मार्गदर्शन मिळाल्यावर या मुलांच्या कल्पनाशक्ती भरार्‍या घेतात आणि सर्जनशीलपणे प्रश्न सोडवायच्या तंत्रानं अनोख्या बोटी, सेतू आणि चक्क रोलर कोस्टर सुद्धा निर्माण करतात.

गणित शिक्षण बदलण्यासाठी आर्थर बेंजामिन यांचे सूत्र

TED2009

गणित शिक्षण बदलण्यासाठी आर्थर बेंजामिन यांचे सूत्र
2,625,810 views

गणिताच्या शिक्षकाला कुणीतरी एखादा नेहमी हा प्रश्न विचारतो, "मी रोजच्या आयुष्यात कलनशास्त्र वापरणार आहे का?" आणि आपल्यापैकी बहुतेकांसाठी, आर्थर बेंजामिन म्हणतात, उत्तर "नाही" हे असते. डिजिटल युगात गणिताचे शिक्षण समायोचीत करण्यासाठी ते एक धाडसी प्रस्ताव मांडतात.

रिचर्ड सेंट जॉन: "यशप्राप्ती हा एक अंखडित प्रवास आहे"

TED2009

रिचर्ड सेंट जॉन: "यशप्राप्ती हा एक अंखडित प्रवास आहे"
4,347,745 views

त्यांच्या विशिष्ठ आणि मनमोकळ्या पद्धतीने, रिचर्ड सेंट जॉन आपल्याला आठवण करून देतात की, यश मिळवणे हा एकेरी रस्ता नसून एक अखंडित प्रवास आहे. ते स्वतःच्या व्यवसायाची गोष्ट उदाहरण म्हणून घेऊन एक महत्वाचा धडा शिकवतात - जो थांबला, तो संपला.

काकी किंग: "पिंक नॉइझ " गिटारवर वाजवताना

TED2008

काकी किंग: "पिंक नॉइझ " गिटारवर वाजवताना
1,191,453 views

काकी किंग, रोलिंग स्टोन च्या यादीत येणारी पहिली महिला गिटार वादक, TED २००८ च्या मंचावरती कमालीचे वादन करते, तिने तिचे प्रसिध्द एकपात्री "प्लेयिंग विथ पिंक नॉइझ" सुद्धा प्रस्तुत केले. अचंबित करणारी गिटार वाजवण्याची पद्धत खरच वेगळी आहे.